Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काहीही म्हणा, पण रोहित कर्णधार म्हणून भारतासाठी भारीच! एकाच वर्षात जिंकले तब्बल ‘एवढे’ टी20 सामने

November 2, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा बदला बांगलादेशविरुद्ध घेतला. टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात भारत आणि बांगलादेश संघ ऍडलेडच्या मैदानावर आमने-सामने होते. या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या 5 धावांनी सामना खिशात घातला. या विजयामुळे रोहित शर्मा याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे आणि तो अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला कर्णधार बनला.

सामन्याचा आढावा
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावत 184 धावा चोपल्या. या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिली 7 षटके खेळून काढली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार, षटके आणि आव्हान कमी करण्यात आले. 16 षटकांमध्ये बांगलादेशला 151 धावांचे आव्हान मिळाले. मात्र, हे आव्हान पार करताना बांगलादेशने 6 विकेट्स गमावत 146 धावाच केल्या. त्यामुळे भारताना हा सामना 5 धावांनी जिंकला.

.@imVkohli bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Bangladesh in Adelaide. 👌 👌

Scorecard ▶️ https://t.co/Tspn2vo9dQ#T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/R5Qsl1nWmf

— BCCI (@BCCI) November 2, 2022

रोहित शर्माचा विक्रम
या विजयामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) हा एका वर्षात सर्वाधिक 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार बनला. याव्यतिरिक्त रोहित अशी कामगिरी जगातील दुसरा कर्णधार बनला. त्याच्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने 2021 या एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याची कामगिरी केली होती.

भारताची गुणतालिकेत भरारी
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे गुणतालिकेत चांगला फायदा झाला आहे. गुणतालिकेत भारताने भरारी घेतली असून अव्वल क्रमांक पटकावला आहे. भारताने टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चार सामन्यात भारताला फक्त एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सहन करावा लागला होता. मात्र, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि आता बांगलादेशला हरवत भारताने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. आता या विजयानंतर भारताने 6 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. तसेच, भारताचा नेट रनरेट हा +746 इतका आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाब्बास रे वाघांनो! थरारक सामन्यात बांगलादेशला धूळ चारत टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये
रोहितचंच चुकलंय! अजय जडेजांनी ‘या’ खेळाडूंवर फोडले दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पराभवाचे खापर


Next Post
India in T20 WC 2022

बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानला दणका! वाचा नक्की कसे झाले नुकसान

Bas de Leede

मानलं रे गड्या ! चेहऱ्याची जखम भरलीही नाही, तरीही झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरला 'हा' खेळाडू

IND-vs-BAN

बांगलादेशला कमी फरकाने धूळ चारण्यात भारत आहे 'मास्टर', 2016मध्येही केलीय खास कामगिरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143