पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने त्याच्या सार्वाकालिक विश्वचषक संघाची निवड केली आहे. महत्त्वाची गोष्ट ही की, त्याने आपल्या संघात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान दिले नाही. Shahid Afridi all time world cup xi.
एवढेच नव्हे तर, त्याने पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार इमरान खान आणि भारताचा माजी यशस्वी कर्णधार एमएस धोनीलाही आपल्या संघात सामाविष्ट केले नाही. त्याने त्याच्या सार्वकालिक विश्वचषक संघात फक्त एका भारतीय क्रिकेटपटूला स्थान दिले आहे आणि तो क्रिकेटपटू म्हणजे, भारताचा कर्णधार विराट कोहली.
आफ्रिदीने त्याच्या संघात मुख्यत: पाकिस्तानी क्रिकेटपटूंना स्थान दिले आहे. यात त्याच्या ५ संघसहऱ्यांचा त्याने समावेश केला आहे. शिवाय, त्याने ऑस्ट्रेलियाच्या ४ खेळाडूंना आणि दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला आपल्या संघात निवडले आहे.
आपल्या सार्वकालिक विश्वचषक संघात सलामीला फलंदाजी करण्यासाठी आफ्रिदीने सईद अन्वर आणि ऍडम गिलख्रिस्टला निवडले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार रिकी पाँटिंग आणि चौथ्या क्रमांकावर विराटला निवडले आहे. तर, ५व्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकला सामाविष्ट केले आहे.
शिवाय, या संघात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसची निवड केली आहे. वेगवान गोलंदाजीसाठी वसिम अकरम, शोएब अख्तर आणि ग्लेन मॅकग्रा हे गोलंदाज आहेत. तर, फिरकी गोलंदाजीसाठी त्याने पाकिस्तानचे सक्लेन मुश्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्न यांचा समावेश आहे.
असा आहे शाहिद आफ्रिदीचा सार्वकालिन विश्वचषक संघ-
सईद अनवर, ऍडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, इंजमाम उल हक, जॅक कॅलिस, वसिम अक्रम, शेन वॉर्न, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक आणि ग्लेन मॅकग्रा
ट्रेंडिंग घडामोडी –
ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गजाने टीम इंडियाला दिला ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा कानमंत्र
कॅप्टन कूल धोनीचा दाढीतील न्यू लूक पाहिलाय का? पाहून अवाक् व्हाल…