भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने २०१८ साली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो आता राजकारणाच्या मैदानात तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे. गंभीरने मोठमोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी महत्वाची खेळी केली आहे. त्याने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळलेली खेळी असो किंवा २०११ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ९७ धावांची खेळी. एक क्रिकेट चाहता त्याचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. परंतु अनेकदा तो मैदानावर संताप व्यक्त करताना देखील दिसून आला आहे.
रागीट स्वभावामुळे नेहमीच राहिला आहे चर्चेत
क्रिकेट आणि राजकारणाचे मैदान गाजवणारा गौतम गंभीर हा आपल्या रागीट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यात अनेकदा त्याचे रौद्र रूप पाहायला मिळाले आहे. तसेच गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांचे १४ वर्षांपुर्वी झालेले प्रकरण आजही चर्चेत असते.
आफ्रिदीला गंभीरचा कोपर लागल्यानंतर झाला होता वाद
ही घटना २००७ मध्ये घडली होती. जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये कानपूरमध्ये वनडे सामना खेळला जात होता. या सामन्यात गौतम गंभीरने शाहिद आफ्रीदीच्या चेंडूवर चौकार लगावला होता. त्यानंतर आफ्रिदीने संतापात गौतम गंभीरकडे पाहून काहीतरी म्हटले होते. त्यानंतर पुढील चेंडूवर गौतम गंभीरने एक धाव घेत असताना अफ्रिदीला धडक दिली होती. त्यावेळी गंभीरचे कोपर आफ्रिदिला लागले होते. त्यानंतर दोघांमध्येही शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु पंचांनी हस्तक्षेप करत, हे भांडण सोडवले होते. (Shahid Afridi and gautam gambhir feud turned ugly in 2007 kanpur odi)
गौतम गंभीरची क्रिकेट कारकीर्द
गौतम गंभीर याने २००३ मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने बांगलादेश संघाविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिला सामना खेळला होता. त्याने १४७ वनडे सामन्यात ३९.६८ च्या सरासरीने ५२३८ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ शतक आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ५८ कसोटी सामन्यात ४१. ९५ च्या सरासरीने एकूण ४१५४ धावा केल्या आहेत. यामध्ये ९ शतक आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण ३७ टी-२० सामने खेळले होते. यामध्ये त्याने २७.४१ च्या सरासरीने ९३२ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
कुलदीप यादवसाठी श्रीलंका दौरा ठरेल शेवटची संधी, संघात स्थान मिळण्याबाबत दिली ‘ही’ प्रतिक्रिया
विश्वविजेत्या टी२० संघातील ‘हे’ २ भारतीय धुरंधर पुन्हा घडवणार इतिहास, गाजवणार २०२१चा वर्ल्डकप
टोमणे मारण्यात पटाईत; भारतीय महिला संघाची स्तुती करताना वॉनचा विराटसेनेला टोमणा