---Advertisement---

“तुमच्याकडे प्लॅन-बी नव्हता का?” पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भडकला आफ्रिदी

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 12:40 AM
---Advertisement---

पाकिस्तानमधील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या पाकिस्तान सुपर लीगचा सहावा हंगाम अर्ध्यातच स्थगित करावा लागला होता. स्पर्धेदरम्यान कोविड-१९ या साथीच्या आजाराचे रुग्ण सापडल्याने ही स्पर्धा थांबवली गेली होती. त्यानंतर, आता ही स्पर्धा अर्ध्यात स्थगित केल्याने, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी भडकला आहे. त्याने याविषयी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली.

अर्ध्यात थांबवावा लागला पीएसएल हंगाम
आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानमध्ये सुरू केलेल्या पीएसएल सहावा हंगाम अर्ध्यावर थांबवावा लागला. स्पर्धेदरम्यान कोविड-१९ आजाराचे ७ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये इंग्लंडचा टॉम बॅन्टन व ऑस्ट्रेलियाचा फवाद अहमद यांचा समावेश होता. २२ फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा १४ सामने खेळल्यानंतर ४ मार्च रोजी स्थगित केली गेली.

आफ्रिदीने दिली संतप्त प्रतिक्रिया
पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू व पीएसएलमध्ये मुलतान सुलतान्स संघासाठी खेळणाऱ्या शाहिद आफ्रिदीने पीएसएल अर्ध्यात थांबवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली. आफ्रिदी म्हणाला, “पीएसएल अर्ध्यात थांबवणे दुर्दैवी होते. पाकिस्तान व पाकिस्तान क्रिकेटसाठी ही दुःखाची बाब आहे. पीसीबीकडे अशा महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी प्लॅन बी नव्हता का?”

दुसरीकडे पीएसएलमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचे संघमालक नदीम उमर यांनी पीएसएलमध्ये कोविड-१९ चे रुग्ण सापडण्यासाठी पीसीबीला जबाबदार ठरले. ते म्हणाले, “स्पर्धेदरम्यान कराचीतील बायो बबलमध्ये रुग्ण सापडण्यास ९०% पीसीबी जबाबदार आहे. ते स्पर्धेचे योग्यरीत्या संचलन करू शकले नाहीत. पीसीबी अध्यक्ष व फ्रेंचायसीमध्ये संवाद साधला जात नव्हता.”

पीएसएल उर्वरित हंगाम जून महिन्यात खेळवला जाईल असे पीसीबी अध्यक्ष एहसान मनी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

सूर्यकुमारच्या नावे जमा झाला खास विक्रम; रोहित-रहाणेच्या पंक्तीत मिळवले स्थान

‘त्या’ खेळाडूचे पुनरागमन होताच भारतीय संघ आणखी मजबूत होईल, बॉलिवूड अभिनेत्याचा दावा

उडता बेन! स्टोक्सचा एकहाती झेल पाहून व्हाल चकित, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---