आशिया चषक २०२२ स्पर्धेचे बिगूल वाजले असून २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील महामुकाबला अर्थात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २८ ऑगस्टला दुबई येथे खेळला जाणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यातून पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी अनुपलब्ध असेल. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यानंतर आता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने शाहीनच्या दुखापतीबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन (Shaheen Afridi) हा गुडघ्याच्या (Shaheen Afridi Injury) दुखापतीमुळे आशिया चषकातून (Asia Cup 2022) बाहेर झाला आहे. त्याबरोबरच तो इंग्लंंड विरुद्धच्या टी२० मालिकेतूनही संघाबाहेर झाला आहे. शाहीनच्या गुडघ्याचे स्कॅन करण्यात आले असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पीसीबी) मेडीकल रिपोर्ट्सनुसार, त्याला डॉक्टरांनी ४-६ आठवड्यांचा आराम सांगितला आहे. यामुळेच तो आगामी दोन्ही मोठ्या मालिकांना मुकणार आहे.
अशात शाहीनचा होणारा सासरा, शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi) ट्वीटवरील एका चाहत्याला शाहीनच्या दुखापतीमागचे (Shahid Afridi On Shaheen Afridi Injury) कारण सांगितले आहे. आपण शाहीनला अगोदरच सल्ला दिला होता. परंतु त्याने आपले एक ऐकले नाही आणि जखमी झाला, असे आफ्रिदीचे म्हणणे आहे.
आफ्रिदीने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘मी त्याला यापूर्वीही समजून सांगितले होते की, तू वेगवान गोलंदाज आहे. डाईव्ह मारू नकोस, असे केल्यास तुला दुखापत होईल. परंतु मला जरा उशीराने जाणीव झाली की, तो माझे कसे ऐकेल? शेवटी तोही आफ्रिदीच आहे. या ट्वीटसोबत आफ्रिदीने हसण्याचा इमोजीही जोडला आहे.’
https://twitter.com/SAfridiOfficial/status/1561377397093662723?s=20&t=pw1_9ownYg-WduZ-ghacpg
शाहीद आफ्रिदीचा जावई बनणार आहे शाहीन
पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू शाहीद आणि सक्रिय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी लवकरच नातेवाईक बनणार आहेत. आफ्रिदी त्याची मोठी मुलगी अक्शा आफ्रिदी हिचे लग्न शाहीनसोबत करणार आहे. अक्शाला डॉक्टर बनायचे आहे आणि तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा निकाह केला जाणार नसल्याचे आफ्रिदीने सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक आणि पत्नी नताशाचा ‘विषयच हार्ड’! रोमँटिक पोज देत स्विमिंग पूलमध्ये लावली आग
गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर थिरकला ‘सिक्सर किंग’, पाहा युवराज सिंगचा भन्नाट डान्स
एकाच दिवशी एकाच फलंदाजाने क्रिकेटमध्ये केली होती दोन शतकं






