पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा सर्वाधिक वनडे खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ५वा येतो. त्याने कारकिर्दीत ३९८ वनडे सामने खेळले आहेत परंतु कारकिर्दीत त्याने डावात एकदाही १०० चेंडू खेळले नाहीत.
वनडे क्रिकेटमध्ये ग्लेन टर्नर यांनी एकदा २०१ तर एकदा १७१ चेंडू खेळले आहेत. सुनिल गावसकर यांनी तर १७४ चेंडूत नाबाद ३६ धावाही केल्या होत्या. भारताच्याच रोहित शर्माने १७३ चेंडूत २६४ धावांची कमाल खेळी केली होती.
असे असताना ३७ चेंडूत १०२ धावा करणाऱ्या आफ्रिदीला कधीही १०० चेंडूंचा सामना मात्र करता आला नाही. त्याने ३९८ वनडे सामन्यांत २३.५७च्या सरासरीने ६८९२ चेंडूंचा सामना करताना ८०६४ धावा केल्या. यात ६ शतके व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडे सर्वाधिक चेंडू त्याने ९४ चेंडूंचा सामना केला आहे. पाकिस्तानच्या कॅनडा टूरमध्ये आफ्रिदीने भारताविरुद्ध खेळताना ९४ चेंडूत १०९ धावा केल्या होत्या. त्याला या सामन्यात १०० चेंडू खेळण्याची संधी होती परंतु सुनिल जोशीने त्याला आगरकरकडे झेल द्यायला भाग पाडले.Shahid Afridi – Longest ODI career without lasting 100 balls in a match.
महत्त्वाच्या घडामोडी-
–बापरे! एमएस धोनीला कूल कॅप्टन्सीसाठी मिळाला होता सामनावीर पुरस्कार
–आणि फिल्डरला अद्भुत कामगिरीसाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच
–एक नाही दोन नाही तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती मॅन ऑफ द मॅच
–एकही विकेट, धाव किंवा झेल न घेणाऱ्या खेळाडूला जेव्हा मिळतो मॅन ऑफ द मॅच