fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जेव्हा ग्राऊंड्समनला दिला होता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार

न्यूझीलंड संघ २०००मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी सामने खेळण्यासाठी आला होता. यातील पहिला सामना ब्लोएमफोंटेन येथे दक्षिण आफ्रिकेने ५ विकेट्सने जिंकला. तर दुसरा सामना एलिजाबेथ येथे आफ्रिकेनेच ७ विकेट्सने जिंकला.

यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेचा निकाल सन्मानजनक लावण्यासाठी न्यूझीलंड संघ उत्सुक होता तर मालिकेत न्यूझीलंडला ३-० अशी धुळ चारण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ प्रयत्न करणार होता.

तिसरा कसोटी सामना वंडर्स, जोहान्सबर्ग येथे ८ ते १२ डिसेंबर २००० रोजी होणार होता. परंतु सामन्याच्या पहिल्या दिवशीच पावसाने घोळ घातला व संध्याकाळी ४ वाजून १२ मिनीटांनी खेळ थांबविण्यात आला. तर दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी १० वाजता सुरु झाला. मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊनही तेव्हा ग्राऊंड स्टाफने दुसऱ्या दिवसासाठी मैदान तयार केले. या सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने सर्वबाद २०० धावा केल्या होत्या तर गॅरी कर्स्टनला बाद करत दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशीच्या शेवटी १ बाद १८ धावा केल्या होत्या. या दिवशी एकूण ९९ षटकांचा खेळ झाला. याचे सर्व श्रेय हे ग्राऊंड्समनला देण्यात आले.

जेव्हा तिसरा दिवस उगवला तेव्हा मात्र धो धो पावसला सुरुवात झाली होती. त्यामुळे दुपारी २ वाजून ४० मिनीटांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. चौथ्या दिवशीही हीच परिस्थिती राहिली. यात सकाळी १० वाजताच दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

न्यूझीलंडचा एक डाव पुर्ण तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाची सुरुवात केली होती त्यामुळे पाचव्या दिवशी कसोटी सामन्याचा कोणताही निकाल लागण्याची शक्यता जवळपास मावळली होती. तरीही ग्राऊंड स्टाफचा प्रमुख असलेल्या ख्रिस स्काॅट व त्याच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं. यामुळे अशक्य असलेला पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला व दक्षिण आफ्रिकेने तब्बल ९२ षटकं फलंदाजी केली. अखेर ३ बाद २६१ धावा केलेल्या आफ्रिकेने डाव घोषीत केला. त्यानंतर या धावसंख्येवरच सामना अनिर्णित म्हणून घोषीत करण्यात आला.

परंतु या सामन्यात सामनावीर पुरस्कार जेव्हा देण्याची वेळ आली तेव्हा सामनाधीकाऱ्यांनी एखाद्या गोलंदाज किंवा फलंदाजाचे नाव घेतले नाही. तर त्यांनी ख्रिस स्काॅट व त्याच्या टीमने केलेल्या चांगल्या कामाबद्दल ख्रिस स्काॅटला सामनावीर पुरस्कार दिला. Chris Scott is the only groundsman to be awarded a man of the match. तसेच या मालिकेचा मालिकावीर मखाया एॅंटीनी ठरला. नौशाद अली यांनी या सामन्यात सामनाधीकारी म्हणून काम पाहिले.

पुढे २००३मध्ये ख्रिस स्काॅट यांना क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने २०१३सालचा ग्राऊंड्समन ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित केले.

महत्त्वाचे लेख-

पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?

रोहितसह हे ३ फलंदाज टी२० क्रिकेटमध्ये करु शकतात द्विशतक

क्रिकेटमधील अशा ५ बॅट्स, ज्यांच्यामुळे झाले होते मोठे वाद

You might also like