fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?

शिक्षण हा जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण हे जीवन समृद्ध करणारी अतिशय महत्वाची गोष्ट समजली जाते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तुम्हाला तुमचं शिक्षण काय हा प्रश्न नेहमीच विचारला जातो.

परंतु काही क्षेत्र अशी असतात जिथे काही लोकांनी शिक्षणापेक्षा आपल्या कर्तृत्वाने ते क्षेत्र गाजवले आहे. त्यात नेहमी सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिले जाते. परंतु भारतीय संघातील अन्य खेळाडूंच्या शिक्षणाबद्दल तेवढी चर्चा होत नाही.

म्हणून या लेखात भारतीय संघातील खेळाडूंच्या शिक्षणावर हा प्रकाश टाकणारा हा लेख.

#१ एमएस धोनी
सध्याच्या भारतीय संघातील सर्वात जेष्ठ सदस्य आणि कॅप्टन कूल अशी ओळख असणारा खेळाडू म्हणजे एमएस धोनी. धोनीने बीकॉमचे शिक्षण क्रिकेटमुळे अर्ध्यातून सोडले आहे. परंतु २०११ साली याच कॉलेजने त्याला मानद डॉक्टरेट ही पदवी दिली आहे. सेंट झेवियर ह्या कॉलेजमधून त्याने शिक्षण केले आहे.

#२ विराट कोहली
भारतीय क्रिकेटचा तिन्ही प्रकारातील कर्णधार आणि जगात सध्या सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळख असणाऱ्या विराटाचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे. विराटने सुरुवातीचे काही शिक्षण विशाल भारतीमध्ये तर ९वी नंतरचे शिक्षण सोव्हिएर कॉन्व्हेंट येथे झाले आहे.

#३ शिखर धवन
सध्या वनडे आणि कसोटी असे दोनही प्रकार गाजवत असलेला शिखर धवन हा विराट प्रमाणे दिल्लीकर खेळाडू. विशेष म्हणजे विराट प्रमाणे शिखरचे शिक्षण देखील १२ वी पर्यंत झाले आहे. दिल्लीतील सेंट मार्क्स सिनियर सेकंडरी हाय स्कूलमध्ये त्याने हे शिक्षण घेतले आहे.

#४ रोहित शर्मा
विराट आणि शिखर प्रमाणेच मुंबईकर रोहित शर्माचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे. त्याने मुंबईमधील आवर लेडी ऑफ वेलंकनी आणि नंतर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण झाले आहे.

#५ मुरली विजय
भारतीय कसोटी संघातील विश्वसनीय सलामीवीर मुरली विजय हा शिक्षणात अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या पुढे आहे. त्याने एसआरएम विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

#६ अजिंक्य रहाणे
मुंबईकर अजिंक्य रहाणेचे १२वी पर्यंतचे शिक्षण डोंबिवली, मुंबई येथे झाले आहे. पुढे त्याने बीकॉम मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे.

#७ रविचंद्रन अश्विन
आर अश्विनने माहिती तंत्रज्ञान विषयात इंजिनीरिंग केले आहे. दक्षिणेकडील क्रिकेटपटू हे शिक्षणातही कमी नसतात हे आपण कुंबळे, द्रविड आणि मुरली विजयवरून पहिलेच आहे. अश्विन देखील हाच वारसा पुढे चालवत आहे.

#८ हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या हा सध्या आपल्या फलंदाजीमुळे आणि गोलंदाजीमुळे क्रिकेट गाजवत आहे. परंतु आपण हार्दिकचे शिक्षण किती झाले हे ऐकले तर आश्चर्यचकित व्हाल. हार्दिक पंड्याने ९वी मधून शिक्षण सोडले आहे. घराची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे हार्दिकला हा निर्णय घ्यावा लागला.

#९ उमेश यादव
उमेश यादवने खापरखेडा येथील शंकर राव चव्हाण विद्यालयातून १०वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. हा खेळाडू पुढे अर्थार्जनासाठी पोलीस कॉन्स्टेबलची नोकर भरतीसाठी प्रयत्न करत होता. सध्या तो आरबीआयमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर आहे.

#१० जसप्रीत बुमराह
वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने आपले १०वी पर्यंतचे शिक्षण निर्माण हाय स्कूल,अहमदाबाद येथे केले आहे. त्याच्या पुढील शिक्षणाची माहिती उपलब्ध नसली तरी तो एका उच्च शिक्षित घरातून आहे.

#११ भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमारने आपले १०वी पर्यंतचे शिक्षण हे मेरठ येथून पूर्ण केले आहे.

#१२ मोहम्मद शमी

मोहम्मद शमीच्या शिक्षणाबद्दल खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. परंतु काही संकेतस्थळानुसार त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

#१३ केएल राहुल
दक्षिणेतील आणखी एक क्रिकेटर म्हणजे केएल राहुल. राहुलचे वडील इंजिनीरिंग कॉलेजला शिक्षक असल्याकारणाने राहुलने इंजिनीअर बनावे ही वडिलांची इच्छा होती. परंतु क्रिकेट आणि इंजिनीरिंग बरोबर जमणार नाही म्हणून राहुलने बीकॉमचा मार्ग निवडला.

#१४ अक्सर पटेल
अक्सर पटेल हा अष्टपैलू खेळाडू धर्मसिंह देसाई विद्यापीठ, गुजरात येथून मेकॅनिकल इंजिनीरिंग पूर्ण केलेला खेळाडू आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

क्रिकेटचे फॅन्स आहात! ही आहे आजची सर्वात मोठी गुड न्यूज

या ५ खेळाडूंचं नाव होतं खूप मोठं, पण कधीही झाले नाहीत टीम इंडियाचे कर्णधार

प्रो कबड्डीतील ह्या पाच संघाचा सोशल मीडियावर सर्वाधिक चाहतावर्ग….

७ दिवसांत रोहितच्या टीकाकारांचे तोंड झाले बंद, आकडेच असे आले समोर

सतत बडबड करणाऱ्या चहलला रोहितचे सणसणीत उत्तर

You might also like