fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

प्रो कबड्डीतील ह्या पाच संघाचा सोशल मीडियावर सर्वाधिक चाहतावर्ग….

प्रो कबड्डी लीग देशातील दुसरी लोकप्रिय लीग आहे. इंडियन प्रीमियर लीग देशातील सर्वाधिक लोकप्रिय व चाहता वर्ग असलेली लीग आहे. प्रो कबड्डीने कबड्डी खेळला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. प्रो कबड्डी मुळे कबड्डीचा चाहता वर्ग तयार झाला आहे.

प्रो कबड्डीच्या खेळाडु व संघाचा चाहता सोशल मीडियावर आहे. प्रो कबड्डीत आतापर्यत ७ सिजन झाले आहेत. आतापर्यंत प्रो कबड्डीत १२ संघांनी सहभाग घेतला आहे. त्यात यु मुंबा, तेलुगू टायटन्स, पुणेरी पलटण, पाटणा पायर्ट्स, जयपूर पिंक पँथर्स, दबंग दिल्ली, बेंगळुरू बुल्स, बंगाल वॉरियर्स हे संघ पहिल्या सिजन पासून प्रो कबड्डीत आहेत तर गुजरात फॉर्च्यून जायंट्स, हरियाना स्टीलर्स, तामिळ थालवाज व यूपी योद्धा हे संघ सिजन ५ पासून प्रो कबड्डीत आले.

प्रो कबड्डीतील १२ संघाच्या फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामवर ऑफिशल अकाऊंटचा आकडेवारी नुसार बघितल्यास ६ संघाचे चाहते हे १० लाखापेक्षा जास्त आहेत. प्रो कबड्डीत सर्वाधिक ३ वेळ विजेता ठरलेला पाटणा पायर्ट्स संघाचा सोसिएल मीडियावर सर्वाधिक चाहता वर्ग आहे. पाटणा पायर्ट्सच्या ट्विटर फेसबुक व इन्स्टाग्रामवर मिळवून एकूण १४ लाख ८७ हजार चाहता आहे.

पाटणा पायर्ट्स संघ तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्या संघात रेकॉर्ड ब्रेकर प्रदीप नरवाल सारखा रेडर असताना साहजिकच त्याच्या चाहता वर्गा संघ सोबत असणारच. पाटणा नंतर बेंगळुरू बुल्सचा चांगला चाहता आहे. सिजन ६ मधील विजेत्या असलेल्या यासंघांत पवन कुमार शेरावत, रोहित कुमार ह्याचा चाहता आहे.

बेंगळुरू बुल्स यांच्या जवळपास यु मुंबाचा चाहता आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवर मिळवून एकूण १३ लाख ५२ हजार चाहता आहे. यु मुंबा कडून पहिले ५ सिजन मध्ये अनुप कुमारचा चाहता होता, त्यानंतर आता फझल अत्रचलीचा चाहता आहे. जयपूर पिंक पँथर्स, पुणेरी पलटण व दबंग दिल्लीचा सोशल मीडियावर १० लाखापेक्षा अधिक चाहता आहे.

सोशल मीडियावरील प्रो कबड्डीच्या संघाचा चाहता:
(फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्राम सर्व मिळून)

१) पाटणा पायर्ट्स- १४ लाख, ८७ हजार चाहता

२) बेंगळुरू बुल्स- १३ लाख ६१ हजार चाहता

३) यु मुंबा- १३ लाख ५२ हजार चाहता

४) पुणेरी पलटन- ११ लाख २९ हजार चाहता

५) दबंग दिल्ली- ११ लाख २६ हजार चाहता

You might also like