fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

७ दिवसांत रोहितच्या टीकाकारांचे तोंड झाले बंद, आकडेच असे आले समोर

नुकतीच आयसीसीने सर्वात चांगला पुल शॉट मारणाऱ्या फलंदाजांंच्या यादीत रोहित शर्माला स्थान दिले नव्हते. यानंतर रोहितने आयसीसीला ट्रोल केले होते.

रोहित हा सध्याच्या काळात पुल शॉट खेळून धावा करणाऱ्यांच्या यादीत सर्वात पुढे आहे. त्याने २०१५ नंतरचे आकडे पाहिले तर त्याने आपल्या सर्वाधिक धावा पुल शॉट खेळून केल्या आहेत.

इतकेच नव्हे तर पुल शॉट (Pull Shot) खेळून केलेल्या धावांंच्या यादीत रोहितने सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. रोहितने २०१५पासून आतापर्यंत पुल शॉट खेळून १५६७ केल्या आहेत. तसेच त्याने सर्व क्रिकेट प्रकारात पुल शॉटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. जेव्हा रोहित पुल शॉट खेळतो तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट हा २७४.९१ असतो. तसेच तो पुल शॉट खेळून ५०० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल आहे.

रोहितने २०१५नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुल शॉट खेळून १५६७ धावा, फ्लिक शॉट खेळून १२२९ धावा आणि कव्हर ड्राईव्हने ११०५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एकूण ८९६८ धावा केल्या आहेत. यातील १७.४७ टक्के धावा त्याने पुल शॉट खेळून केल्या आहेत. यामध्ये ११६ षटकारांचा समावेश आहे.

रोहितपाठोपाठ सर्वाधिक षटकार ठोकण्यात ऑएन मॉर्गनचा (Eoin Morgan) क्रमांक लागतो. मॉर्गनने या वर्षांमध्ये ४७ षटकार ठोकले आहेत.

याव्यतिरिक्त मागील ५ वर्षांत पुल शॉट खेळून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितनंतर डेव्हिड वॉर्नर (१२०९), शिखर धवन (८७९), बेन स्टोक्स (८४८) आणि कुशल मेंडिस (७५२) या खेळाडूंचा समावेश होतो.

विशेष म्हणजे आयसीसीने केलेल्या ट्वीटमध्ये यापैकी एकाही खेळाडूच्या नावाचा समावेश नव्हता.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टीम इंडियाच्या नावावर आहेत हे ५ अतिशय खराब विक्रम

-पहिला त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी सेहवागने केली होती ३ वर्ष आधीच

-ज्या गोलंदाजाला रोहितने धु-धु धुतले, तो आता अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट

You might also like