fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या ५ खेळाडूंचं नाव होतं खूप मोठं, पण कधीही झाले नाहीत टीम इंडियाचे कर्णधार

जागतिक क्रिकेटमध्ये जेवढे खेळाडू क्रिकेट खेळले आहेत त्यांचं एकदा तरी आपल्या देशाचे नेतृत्त्व करण्याचं स्वप्न असतं. जेव्हा खेळाडू १०० किंवा अधिक सामने खेळतो तेव्हा तर ही अपेक्षा ठेवण्यातही काही गैर नसत.

वनडे क्रिकेटमध्ये बहुतांश वेळा संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर थोडेफार सामने खेळणाऱ्या खेळाडूलाही संघाचे नेतृत्त्त्व करण्याची संधी मिळते. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र फारच कमी खेळाडूंना देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळते. १ जानेवारी २००० पासून भारतीय कसोटी संघाचे केवळ ११ खेळाडू वनडेत तर कसोटीत ८ कर्णधार झाले आहेत.

भारतीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी १००पेक्षा जास्त कसोटी किंवा ३००पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही त्यांना कधी कर्णधार होता आले नाही. यातील तीन खेळाडूंचा घेतलेला आढावा

५. रविंद्र जडेजा (१६५ वनडे)

सध्याच्या भारतीय संघातील स्टार अष्टपैलू व जबरदस्त क्षेत्ररक्षक असलेला जडेजा भारताकडून १६५वनडे, ४९ कसोटी व ४९ टी२० सामने खेळला आहे. २००९ ते २०२० अशा १२ वर्षांच्या कारकिर्दीत ३१ वर्षीय जडेजाला आजपर्यंत एकही सामना कर्णधार म्हणून खेळण्याची संधी मिळाली नाही. अगदी तिनही प्रकारातील क्रिकेटमध्ये एकही सामना तो कर्णधार म्हणून खेळला नाही. जडेजा सध्या क्रिकेट खेळत असल्यामुळे त्या संधी मिळू शकते.

४. अजित आगरकर (१९१ वनडे)

भारताकडून अजित आगरकर १९९८ ते २००८ अशा काळात एकूण १९१ वनडे, २६ कसोटी व १ टी२० सामना खेळला. यात काळात भारतीय संघाचे वनडेत ७ वनडे कर्णधार झाले परंतु आगरकरला एकाही सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही.

३. जवागल श्रीनाथ (२२९ वनडे)

जवागल श्रीनाथने भारताच्या वेगवान तोफखान्याच्या प्रमुखाची धुरा तब्बल १२ वर्ष वाहिली. या काळात तो भारताकडून २२९ वनडे व ६७ कसोटी सामने खेळला. श्रीनाथ हा भारतातील एक मोठा खेळाडू म्हणून कायम ओळखळा गेला. परंतु असे असतानाही या गोलंदाजाला एकाही सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्त्व करता आले नाही.

२. हरभजन सिंग (२३६ वनडे)

हरभजन सिंग जगातील अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे ज्याने देशाकडून २००पेक्षा जास्त वनडे व १००पेक्षा जास्त कसोटी खेळूनही संघाचे नेतृत्त्व कऱण्याची संधी मिळाली नाही. भज्जीने १९९८ ते २०१५ या काळात एकूण २३६ वनडे, १०३ कसोटी व २८ टी२० सामने खेळले. यातील एकाही सामन्यात त्याला संघाच्या नेतृत्त्वाची धुरा वाहण्याची संधी मिळाली नाही.

१. युवराज सिंग (३०४ वनडे)

भारतीय संघातील एकेकाळजा एक उत्तम फिनीशर, एक चांगला अष्टपैलू व दर्जेदार क्षेत्ररक्षक राहिलेल्या युवराज सिंगला २००० ते २०१७ अशा १७ वर्षांच्या कारकिर्दीत एकाही सामन्यात देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही.

१७ वर्षांच्या कारकिर्दीत युवीने ३०४ वनडे, ५८ टी२० व ४० कसोटी सामने खेळले. त्याच्या १७ वर्षांच्या संपुर्ण कारकिर्दीत भारताने तब्बल ११ वनडे कर्णधार, ८ कसोटी कर्णधार व ६ टी२० कर्णधार पाहिले. याच काळात युवराजपेक्षा अनुभवाने कमी असलेले अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांनाही नेतृत्त्वाची संधी मिळाली. शिवाय पाठीमागून आलेले एमएस धोनी व विराट कोहली हे भारताच्या महान कर्णधारांत गणले जाऊ लागले. परंतु युवराजला मात्र संधी मिळाली नाही.

आकडेवारीवर आधारीत काही मनोरंजक लेख-

२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद कायम रुसलेच

टाॅप ५- वयाची २३ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच कसोटी कर्णधार झालेले खेळाडू

सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार

टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज

टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी

सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच

टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब

टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

You might also like