सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच

क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. त्यामुळे अनेक वेळा वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघ जिंकला की पराभूत झाला याला महत्त्व दिले जाते. परंतु जर खेळाडूने वैयक्तिक चांगली कामगिरी केली तर संघाची जिंकण्याची संधीही त्याच पटीने वाढते.

म्हणूनच क्रिकेटमध्ये जो खेळाडू त्या-त्या सामन्यात चांगला खेळेल त्याला मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर पुरस्कार दिला जातो. तसेच जो खेळाडू संपुर्ण मालिकेत चांगला खेळेल त्याला मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर पुरस्कार दिला जातो.

विशेष म्हणजे माॅडर्न क्रिकेटमध्ये हे पुरस्कार कसोटी, वनडे व टी२० अशा तिनही प्रकारात दिले जातात. जे प्रेक्षक सामना टिव्हीवर पहात असतात ते सामना संपल्यावर कोण सामनावीर होणार याची वाट पहात असतात. सामनावीर हा समालोचन पॅॅनेलमधील सदस्य बहुतांशवेळा निवडतात.

या लेखात वनडे क्रिकेटमध्ये सध्या खेळत असलेल्या अशा खेळाडंची नावे असणार आहेत ज्यांनी सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. परंतु तत्पुर्वी वनडेत सर्वाधिक वेळा कुणी हा पुरस्कार मिळवला हे पाहु.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ४६३ वनडे सामन्यांत तब्बल ६२ वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. जवळपास ७.५ सामन्यांनंतर सचिन कायमच संघातील टाॅप परफाॅर्मर अर्थात सामनावीर राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा सनथ जयसुर्या असून ४४५ सामन्यांत ४८ वेळा त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक ९.२७ सामन्यानंतर त्याने हा कारनामा केला आहे. या यादीत तुलनेने अतिशय कमी सामने खेळलेला सध्याचा भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली आहे. वनडेत २४८ सामन्यांत त्याला ३६वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.  यातील ९ सामन्यात विराटला फलंदाजीची संधीही मिळाली नाही. यामुळे जवळपास ६.६८ सामन्यानंतर किंवा ६.६३ डावानंतर विराटला हा पुरस्कार मिळाला आहे.

वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू व्हिव्हीयन रिचर्ड यांनी १८७ सामन्यांत तब्बल ३१वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. रिचर्ड यांनी फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्हीतही चांगली कामगिरी केली होती. १८७ सामन्यांत त्यांना १६७ वेळा फलंदाजी तर १३१वेळा गोलंदाजी मिळाली. त्यांचे सर्व सामनावीर पुरस्कार जर फलंदाजीतील समजले तर प्रत्येकी ५.३८ डावांनंतर किंवा प्रत्येकी ६ सामन्यानंतर त्यांना सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. याच कारणामुळे त्यांना आजही जगातील वनडेचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटर कदाचीत म्हणत असतील.

सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार वनडेत मिळणारे खेळाडू

३६- विराट कोहली, सामने- २४८

२१- मार्टिन गप्टील, सामने- १८३

२१- रोहित शर्मा, सामने- २२४

१७- डेविड वाॅर्नर, सामने-१२३

१७- राॅस टेलर, सामने- २३२

सध्याच्या वेळीच्या महत्त्वाच्या घडामोडी-

२००७ विश्वचषकाचा हिरो थेट रस्त्यावर उतरुन लोकांना करतोय मदत

२०१७मध्येच जोफ्रा आर्चरने सांगितलं होतं ३ आठवड्यांचं लाॅकडाऊन

टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

You might also like