२०१७मध्येच जोफ्रा आर्चरने सांगितलं होतं ३ आठवड्यांचं लाॅकडाऊन

जगात सध्या कोरोना व्हायरस या साथीच्या रोगामुळे लाॅकडाऊन केले जात आहे. कोविड19 (COVID-19) मुळे भारतातील स्थितीही प्रचंड गंभीर आहे. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल अर्थात २४ मार्च रोजी लाॅकडाऊनची घोषणा केली.

याचदरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा एक २०१७मध्ये केलेला ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. यात त्याने म्हटले आहे की ‘३ आठवडे घरी रहाणं नक्कीच कमी आहे.’

त्यामुळे सद्यस्थितीशी हा ट्विट मिळता जुळता आहे. यामुळे जोफ्राला सगळं आधीच समजतं का असे रिप्लाय त्याच्या ट्विटखाली आले आहेत.

यापुर्वीही जोफ्राचे असेच अनेक ट्विट व्हायरल झाले आहेत, ज्यात त्याने सद्यपरिस्थीतीशी भाष्य करणारे किंवा साम्य असणारे ट्विट अनेक वर्ष आधी करुन ठेवले आहेत.

त्याने आजपर्यंत अंदाजे ३९ हजार ७०० ट्विट केले आहेत. सध्या तो २४ वर्षांचा असून इंग्लंडकडून ७ कसोटी, १४ वनडे व १ टी२० सामना खेळला आहे. तो इंग्लंडचा सध्या प्रमुख वेगवान गोलंदाज असून इंग्लंडने त्याकडे एक भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून पाहिले आहे.

चर्चेतील घडामोडी-

केएल राहुल ५व्या क्रमांकावर एकदम फिट, फक्त एका गोष्टीची आहे कमी

दिलदार पठाण भाऊ! लोकांना दिले एवढे मास्क

शमीला चाहते सध्या गद्दार का म्हणताय? काय आहे कारण?

You might also like