fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटमधील अशा ५ बॅट्स, ज्यांच्यामुळे झाले होते मोठे वाद

क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत अनेकदा फलंदाजांनी विविध प्रकारच्या बॅट वापरलेल्या पहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच बीग बॅश लीगमध्ये खेळताचा राशिद खानने कॅमल बॅट वापरली होती. तर त्याआधी मॅथ्यू हेडनने आयपीएल दरम्यान वापरलेली मुंगुस बॅटचीही बरीच चर्चाही झाली. अनेकदा अशा बॅट्समुळे वादही झाले.

अशाच ५ बॅटमुळे झालेल्या वादाचा घेतलेला हा आढावा –

१. मॉनस्टर बॅट (१७७१) –

जवळपास ३ शतकापूर्वी बॅटच्या आकारामुळे वाद समोर आला होता. यामुळे क्रिकेट बॅटच्या आकाराबद्दलच्या नियमात बदल करण्यात आला. २५ सप्टेंबर १७७१ ला चर्ट्सी आणि हॅमबिल्टन यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हा वाट झाला होता.

या सामन्यात एक फलंदाजाने स्टंपची रुंदी झाकली जाईल एवढ्या रुंदीची बॅट वापरली होती. त्यामुळे चेंडूही बॅटवर सहज येत होता. त्यामुळे फलंदाजाला बाद करता येत नव्हते. त्यावेळी अशा प्रकारची बॅट वापरल्याचा निषेध करण्याशिवाय हॅमबिल्टनच्या खेळाडूंकडे पर्याय नव्हता. या निषेधाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज थॉमस ब्रेट यांनी केले.

नंतर हॅमबिल्टनचा कर्णधार आणि अष्टपैलू रिचर्ड नायरेन, गोलंदाज आणि फलंदाज जॉन स्मॉल यांनीही याचिकेवर स्वाक्षरी केली. त्यामुळे बॅटच्या आकाराच्या नियमात बदल करण्यात आले आणि बॅटचा आकार साडेचार इंचच असली पाहिजे, असा नियम करण्यात आला.

२. ऍल्यूमिनियम बॅट – डेनिस लीली

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज वेगवान गोलंदाज डेनिस लीली यांनी १९७९ च्या ऍशेस मालिकेत पर्थ येथे झालेल्या सामन्यात १५ डिसेंबरला ऍल्यूमिनियमची बॅट वापरली होती. त्या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया ८ बाद २३२ धावा असा संघर्ष करत होता. त्या दिवसाखेर लीली ११ धावांवर नाबाद होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते चक्क ऍल्यूमिनियमची बॅट घेऊन मैदानात आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याआधीही काही दिवसांपूर्वी त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ही बॅट वापरली होती. पण तेव्हा कोणीही तक्रार केली नव्हती.

परंतू पर्थ कसोटीत दुसऱ्या दिवशी चार चेंडूनंतर लीली यांनी इयान बॉथम यांच्या चेंडूवर फटका मारत तीन धावा काढल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ग्रेग चॅपेल यांना वाटले की चेंडू बाऊंड्री पार करुन गेला आहे. त्यामुळे त्यांची राखीव खेळाडू रॉडनी हॉगला लीलीला नेहमीची बॅट देण्यास सांगितले. मात्र लीली यांनी यासाठी नकार दिला.

त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार माईक ब्रेर्लीने ऍल्यूमिनियम बॅटमुळे चेंडू खराब होत असल्याची तक्रार करण्यास सुरुवात केली. अखेर चॅपेल स्वत: मैदानात आले आणि त्यांनी नेहमीची लाकडी बॅट लीलीच्या हातात सोपवली. त्यावेळी लीली चिडले होते.

३. पाँटिंगची कार्बन ग्रेफाइट स्ट्रिप लावलेली बॅट – 

२००६ च्या दरम्यान पाँटिंगच्या बॅटमुळे बरीच चर्चा झाली होती. त्याने कार्बन ग्रेफाइट स्ट्रिप त्याच्या बॅटच्या मागच्या बाजूला लावली होती. त्यामुळे एमसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समीतीकडे (आयसीसी) चिंता व्यक्त केली की कार्बन ग्रेफाइट स्ट्रिपमुळे फलंदाजांला फटके खेळण्यास फायदा होतो.

पाँटिंगने या बॅटसह पाकिस्तान विरुद्ध २००४-०५ च्या मोसमात सिडनी कसोटीत द्विशतक केले होते.

सर्व पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर आणि बॅटच्या प्रत्येक छोटे छोटे तपशिल पाहिल्यानंतर, अशी बॅट वापरणे खरोखरच बेकायदेशीर असल्याचा दावा एमसीसीने केला. त्यांनी द बीस्ट आणि जिनेसिस हॅरीकेन या दोन इतर कुकाबुरा बॅट वापरण्यासही नकार दिला. या बॅट्सच्या मागील बाजूस चमकदार रंगाचे ग्रेफाइट स्ट्रिप लावले असल्याचा दावा करत त्यांनी या बॅट वापरल्याने नियम मोडला असल्याचे म्हटले होते.

४ . मुंगुस बॅट – मॅथ्यू हेडन 

२०१०च्या आयपीएल मोसमादरम्यान माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने मुंगुस बॅट वापरली होती. त्या बॅटची हँडेल लांब होती. तसेच हँडेलच्या खालच्या बॅटचा भाग नेहमीच्या बॅटपेक्षा कमी उंचीचा होता.

या बॅटने हेडनने दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध ४३ चेंडूत ९३ धावांची खेळी केली होती. या बॅटला बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद अश्रफूलनेही समर्थन दिले होते.

त्या बॅटने षटकार मारण्यास फायदा होत होता. मात्र त्या बॅटमुळे रक्षात्मक खेळण्यास अडचण येत होती.

५. गोल्डन बॅट – ख्रिस गेल

२०१५ ला बीग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ख्रिस गेलने गोल्डन बॅट वापरली होती. स्पार्टनची ही बॅट भारतातून ऑस्ट्रेलियात त्याच्यासाठी पाठवली होती. ती बॅट सोनेरी रंगाची असल्याने तिला गोल्डन बॅट म्हटलं गेलं.

गेलने जेव्हा ही बॅट वापरली तेव्हा त्याने मोठे फटके मारले होते. पण तो २३ धावांवर बाद झाला होता. या बॅटमध्ये धातू असल्याचे अनेक चाहत्यांनी दावा केल्याने ती बॅट वापरण्यास बंदी घालण्याची चर्चा झाली.

पण या बॅटमध्ये कोणताही धातू नसल्याचे स्पार्टनचे मालक कुणाल शर्मा यांनी सांगितले.

६. कॅमल बॅट – राशिद खान

२०१९ च्या बीग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळताना राशिद खानने मेलबर्न रेनिगेड्स विरुद्ध कॅमल बॅट वापरली होती. या बॅटच्या मागची बाजू मधे दबलेली होती, जसे उंटाला दोन बाक (कुबड) असतात. त्यामुळे त्याच्या या बॅटची मोठी चर्चा झाली.

या बॅटच्या मदतीने राशिदने १६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २५ धावांची खेळी केली होती. या बॅटचा फोटो Cricket.com.au ने तसेच आयसीसीनेही शेअर केला होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

क्रिकेटचे फॅन्स आहात! ही आहे आजची सर्वात मोठी गुड न्यूज

या ५ खेळाडूंचं नाव होतं खूप मोठं, पण कधीही झाले नाहीत टीम इंडियाचे कर्णधार

प्रो कबड्डीतील ह्या पाच संघाचा सोशल मीडियावर सर्वाधिक चाहतावर्ग….

७ दिवसांत रोहितच्या टीकाकारांचे तोंड झाले बंद, आकडेच असे आले समोर

सतत बडबड करणाऱ्या चहलला रोहितचे सणसणीत उत्तर

You might also like