पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. तोच सिलसिला कायम ठेवत त्याने नुकेतच अजून एक वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी आफ्रिदी काश्मीरबाबत बोलला असून भारतीय हद्दीत असलेल्या काश्मीरमध्ये स्थानिक लोकांवर अत्याचार होत असल्याचे त्याने म्हंटले आहे. तसेच अत्याचाराच्या सगळ्या सीमा येथे पार केल्या जात असून आपण अन्यायाविरोधात आवाज उठवायला हवा, अशी पुस्तीही त्याने जोडली आहे.
काश्मीर प्रीमियर लीगचा ब्रँड अँबसेडर
शाहिद आफ्रिदी पाकव्याप्त काश्मीमध्ये क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच तेथील स्थानिक लोकांना खेळाच्या माध्यमातून जोडण्याचाही त्याचा प्रयत्न आहे. माध्यमांतील वृत्तानुसार आफ्रिदी काश्मीर प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबसेडर पदी नियुक्त झाल्याने उत्साहित आहे. या लीगबद्दल बोलताना तो म्हणाला, “ही लीग अधिकाधिक यशस्वी व्हावी यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. या लीगमध्ये सहभागी होण्याची माझी मनापासून इच्छा होती, ती पूर्ण झाली आहे. यासह मी इथे क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी देखील उत्सुक आहे. मी सगळ्यांनाच या लीगला पाठिंबा देण्याची विंनती करतो. या लीगमुळे येथील स्थानिक गुणवत्तेला वाव मिळेल याची मला खात्री आहे.”
काश्मीरबाबत केले वादग्रस्त विधान
त्यांनतर बोलताना त्याने भारतात सामील असलेल्या काश्मीरबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले. तो म्हणाला, “भारतीय हद्दीत असणाऱ्या काश्मीरमधील लोकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. आणि या अत्याचाराने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. जगात कुठेही आपल्याला अन्याय होताना दिसला तर आपण त्याविरोधात आवाज उठवायला हवा. काश्मिरी लोकांवरचा हा अन्याय थांबवणे, ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र एक दिवस नक्की असा येईल, ज्या दिवशी काश्मीर स्वतंत्र होईल.”
मात्र आफ्रिदीच्या या विधानाने आता नवा वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत. आफ्रिदी ज्या लीगचा ब्रँड अँबसेडर म्हणून नियुक्त झाला आहे, ती लीग पाकव्याप्त काश्मीरमध्ये खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख आरीफ मलिक यांनी या स्पर्धेतून निधी जमा करण्यात येणार असल्याचाही उल्लेख केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– गंभीर पाठोपाठ आता या भारतीय क्रिकेटपटूनेही केला भाजपात प्रवेश