पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याच्या वयाबाबत नुकताच त्याच्या आत्मचरित्रामध्ये मोठा खुलासा केला आहे. आफ्रिदीची अधिकृत नोंदीनुसार जन्मतारिख ही 1 मार्च 1980 अशी आहे आणि त्याने 1996 ला वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण कले. पण त्याच्या वयाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
अखेर आफ्रिदीनेच त्याच्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात त्याचे खरे वय स्पष्ट केले आहे. अफ्रिदीने जन्मतारीख किंवा जन्म महिना सांगितला नसला तरी त्याचे जन्मसाल हे 1975 असल्याचा खुलासा केला आहे.
जर आफ्रिदीचे जन्मसाल 1975 असेल तर तो 2010 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा 34-35 वर्षांचा असेल. तसेच तो 2016 मध्ये टी20 विश्वचषकात पाकिस्तानकडून शेवटचे 40-41 व्या खेळला. पण त्याच्या अधिकृत नोंदीनुसार त्याचे सध्याचे वय हे 39 वर्षे आहे.
अफ्रिदीने आत्तापर्यंत 27 कसोटी, 398 वनडे आणि 99 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यात मिळून त्याने 11,000 पेक्षा अधिक धावा आणि 500 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनुसवरही टीका केली आहे. 2016 मध्ये टी20 विश्वचषकादरम्यान वकार पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होता. पण त्यावेळी त्याच्यात आणि अफ्रिदीमध्ये वाद होते.
याबद्दल अफ्रिदीने आत्मचरित्रात लिहीले आहे की वकार साधारण कर्णधार होता आणि त्यापेक्षा वाईट प्रशिक्षक होता. तो नेहमी कर्णधाराला काय करावे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार अफ्रिदी होता. या विश्वचषकानंतर अफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
–पुढील आयपीएल मोसमात धोनी ऐवजी सुरेश रैना करणार सीएसकेचे नेतृत्व?
–दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, रबाडाला परतावे लागणार मायदेशी; जाणून घ्या कारण
–आयपीएलमध्ये ‘नो बॉल’ वादात चर्चेत आलेल्या या भारतीय पंचांना आयसीसीकडून मोठा धक्का