fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने बूम-बूम या त्याच्या टोपण नावाबद्दल मोठा खुलासा केला आहे. ट्वीटरवर याची माहिती आज आफ्रिदीने दिली.

मायक्रो ब्लोगिंग साईट असलेल्या ट्वीटरवर एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने हा खुलासा केला. यावेळी तुला बूम बूम हे नाव कुणी दिले असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता.

यावेळी रवी शास्त्रींनी हे नाव दिल्याचा खुलासा आफ्रिदीने केला आहे.

आफ्रिदीने वनडेत सर्वात वेगवान शतक करण्याचा पराक्रम १९९६ला केला होता. त्याने ३७ चेंडूत श्रीलंका संघाविरुद्ध हे शतक केले होते.

त्यानंतर १ जानेवारी २०१४ला कोरी अॅंडरसनने ३६ चेंडूत शतक करत हा विक्रम मोडला तर सध्या ३१ चेंडूत शतक करणाऱ्या मिस्टर ३६० एबी डिव्हीलियर्सच्या नावावर हा विक्रम आहे. त्याने १८ जानेवारी २०१५ला विंडीजविरुद्ध हे शतक केले होते.

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रमही आफ्रिदीने केला आहे. ४७६ षटकारांसह हा विक्रम सध्या आफ्रिदी आणि गेलच्या नावावर आहे.

त्याच्या अशा स्फोटक खेळीमुळे तो क्रिकेट जगतात पुढे बूम बूम याच नावानेच ओळखला जाऊ लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी

You might also like