मुंबई । भारत आणि पाकिस्तान या दोन देशात होणारा क्रिकेटचा सामना नेहमीच हायव्होल्टेज राहतो. संपूर्ण जगाची नजर या सामन्या वरती असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली नाही. केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच दोन्ही संघ एकमेकांना भिडत असल्याचे दिसून येते.
आयसीसीच्या स्पर्धेत भारत नेहमीच पाकिस्तानवर भारी ठरला आहे. वनडे विश्वचषकात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सर्व सामन्यात विजय मिळवला.
पण याचदरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने क्रिक कास्टच्या यूट्यूब शोवर बोलताना एक वादग्रस्त विधान केले आहे. तो म्हणाला, “पाकिस्तानने भारताला अनेक सामन्यात हरवले आहे. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना माफी मागण्याची सवय झाली आहे. मला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या क्रिकेट सामना खेळायला खूप आवडते. भारताविरुद्ध झालेल्या क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात मी आनंद घेतला.”
गेल्या काही दिवसांपासून शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध वादग्रस्त विधान करत आहे. दोन तीन महिन्यांपूर्वी त्याने काश्मीरच्या मुद्द्यावर देखील वादग्रस्त विधाने केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी –
टीम इंडियाच्या विजयाचा रथ ‘हा’ संघ रोखणार, माजी खेळाडूचा दावा
सचिन म्हणतो; फक्त आचरेकर सर नाहीत, हे २ लोकंही माझे आहेत गुरु
किंग कोहली सोडणार टीम इंंडियाचे कर्णधारपद?