भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याचे जगभरात चाहते आहेत. मागील पंधरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या विराटने आपल्या शानदार खेळाने सर्वांचे मन जिंकले आहे. फलंदाजीतील अनेक विक्रम त्याच्या नावे जमा असलेले दिसतात. अशात त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जातो. पाकिस्तानचा माजी कर्णधार व दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यानेही विराटचे हे मोठेपण मान्य केले आहे.
विराट कोहली हा 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला जातो. सचिन तेंडुलकरनंतर त्याच्या नावे सर्वाधिक शतके व धावांचा विक्रम आहे. पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात नुकतेच शाहिद आफ्रिदी याला विराटबाबत विचारण्यात आले. क्रिकेटचा वाघ कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने विराटचे नाव घेतले. तो म्हणाला,
“सध्या बाबर जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, क्रिकेटचा वाघ म्हणून मी विराट कोहलीचे नाव घेईल. त्याच्या कारकिर्दीत चढ-उतार आले. मात्र, असे असले तरी अजूनही सध्याच्या क्रिकेटपटूंपैकी कोणीही त्याच्या आसपास नाही.”
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांना देखील असाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी देखील निसंकोचपणे विराटचे नाव घेतलेले. जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटू विराटला सर्वोत्तम असल्याचे म्हणतात.
मागील वर्षी आशिया चषकापर्यंत विराट खराब फॉर्ममधून जात होता. मात्र, आशिया चषकानंतर टी20 विश्वचषकात तसेच द्विपक्षीय मालिकांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत आपला जुना फॉर्म मिळवला होता. आगामी वनडे विश्वचषकात देखील त्याच्याकडून भारतीय संघाला या कामगिरीची अपेक्षा असेल.
(Shahid Afridi Said Virat Kohli Is Tiger Of Cricket)
महत्वाच्या बातम्या-
MPL: कोल्हापूर टस्कर्सचा नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय! मनोज-अंकित विजयाचे शिल्पकार
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची 40 वर्षे






