---Advertisement---

‘मिसेस आफ्रिदी कुठ आहेत’? आफ्रिदीच्या जावयाच्या कुशीत दिसलं चिमुकलं बाळ; आल्या भन्नाट प्रतिक्रिया

On: रविवार, मे 16, 2021 3:00 PM
---Advertisement---

पाकिस्तान संघाचा युवा वेगवान गोलंदाज, शाहीन आफ्रिदी याची काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर वेगळीच हवा होती. तो माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा जावई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते .पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिदीच्या मुलीसोबत शाहीन आफ्रिदीचा विवाह होणार आहे. त्याच्या वडिलांनी याबाबतची पृष्टी केली होती. आता तो आता याच कारणामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.

पुन्हा एकदा सोशल मीडियावर सर्वत्र शाहीन आफ्रिदी आणि अक्सा आफ्रिदी यांची चर्चा रंगू लागली आहे. १४ मे रोजी संपूर्ण जगभरात ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच खास दिवशी शाहीन आफ्रिदीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका लहान बाळासोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे.

या फोटोवर त्याने कॅप्शन म्हणून ‘घरी राहिल्याने मनाला स्फूर्ती मिळते,’ असे लिहिले होते.

हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे. एका युजरने विचारले की, ‘भाई तुझा तर साखरपुडा पण नाही झाला अजून, मग हा मुलगा कोणाचा आहे?’ तसेच दुसऱ्या युजरने विचारले की, ‘मिसेस आफ्रिदी कुठे आहेत.’

 

शाहीन आफ्रिदी आणि अक्सा आफ्रिदी हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. याची माहिती शाहीनचे वडिल अयाज खान यांनी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, “अक्सा जेव्हा आपले शिक्षण पूर्ण करेल तेव्हा यांचा विवाह होईल.”

अक्सा सौंदर्यामुळे नेहमीच असते चर्चेत
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिदची मुलगी २० वर्षीय अक्सा ही नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. अक्साचा जन्म १५ डिसेंबर २००१ रोजी झाला होता. अक्सा सध्या आपले शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचा विवाह करण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे .

शाहीन आफ्रिदीची कामगिरी
पाकिस्तानी संघाचा २१ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तान संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. २०१८ मध्ये पाकिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आफ्रिदीने २५ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने २७ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने खेळलेल्या एकूण २५ वनडे सामन्यात ५१ गडी बाद केले आहेत. यात त्याने २ वेळा ५ पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीच्या काळात हिरो असलेला ‘कुलदीप’ आता राहतोय दुर्लक्षित; ‘या’ ३ कारणांमुळे करावा लागतोय संघर्ष

कोरोनाग्रस्तांसाठी सेहवाग बनला ‘अन्नदाता’; तब्बल ५१ हजार पिडीतांना घरपोच पाठवले मोफत जेवण

WTC फायनलपुर्वी ‘या’ किवी फलंदाजाचा दणका, सलग दुसरे शतक झळकावत टीम इंडियाला दिले आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---