भारतीय क्रिकेटमध्ये आजवर अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. यातील काही खेळाडू त्यांच्या खेळामुळे प्रसिद्ध झाले, तर काही जण त्यांच्याकडे असणाऱ्या खेळाडूवृत्तीमुळे. या यादीत मात्र एक नाव असे आहे ज्याच्या खेळावर कोणीही आजवर प्रश्नचिन्ह उचललेले नाही, शिवाय त्याच्या आक्रमक स्वभावाचे अनेक जण चाहते आहेत. ते नाव म्हणजे भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली. विराट ज्या आक्रमकतेने खेळतो त्यामुळे त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मात्र, आता विराटने हाच आक्रमकपणा कमी करावा असा सल्ला पाकिस्तानच्या एका दिग्गजाने त्याला दिला आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीच्या आक्रमकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. विराट बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. त्याला बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. असं असलं तरी २०२१ हे वर्ष विराट कोहलीसाठी कठीण होतं. हे ते वर्ष होते जेव्हा टीम इंडिया टी२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्या फेरीतून बाहेर पडली होती. त्यानंतर त्याने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कर्णधारपद सोडले. तत्पूर्वी, कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत त्याला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते.
आफ्रिदीने विराटच्या आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाला की, “कोहली अजूनही त्याच प्रेरणाने खेळतो आहे का, ज्याप्रमाणे तो सुरुवातीच्या काळात खेळत होता. कोहली पुन्हा नंबर १ बनू इच्छितो का? किंवा त्याने जे काही मिळवले त्यावर तो समाधानी आहे का? करिअरच्या सुरुवातीला विराट कोहलीला जगातील नंबर १ फलंदाज बनायचे होते. आता त्याच प्रेरणेने तो क्रिकेट खेळतोय का? हा एक मोठा प्रश्न आहे. किंवा त्याला असे वाटते की त्याने आयुष्यात सर्वकाही मिळवले आहे.”
दरम्यान, विराट कोहलीला अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध शतक केले. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून आता २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आयपीएल २०२२ मध्येही विराट कोहलीची बॅट शांत राहिली. लीगच्या १५ व्या हंगामात त्याने १६ सामन्यात ३४१ धावा केल्या. यादरम्यान त्याला केवळ २ अर्धशतके झळकावता आली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ बाबतीत इंग्लंडला भरावा लागलाय सर्वात जास्त दंड, भारतही काही मागे नाही
आयपीएल मीडिया राईट्स: प्रत्येक चेंडू अन् प्रत्येक षटकामागे मिळणारी रक्कम पाहुन व्हाल थक्क
भारताचे ‘हे’ शिलेदार आयर्लंड विरुद्ध खेळताना करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण






