पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मागच्या काही सामन्यांपासून त्याच्या कमी स्ट्राईक रेटमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदी देखील त्याच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीये. गुरुवारी (13 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी बाबर आझमने एक वक्तव्य केले होते, ज्यामुळे आफ्रिदीने त्याला चांगलेच सुनावले आहे.
गुरुवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यापूर्वी बाबर आझम (Babar Azam) माध्यमांशी बोलत होता. यावेळी बांगलादेश संघाला 160 धावांचे लक्ष्य देऊ इच्छित आहोत, असे बाबर म्हणाला होता. या वक्तव्यानंतर शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने पाकिस्तानी कर्णधाराला चांगलेच सुनावले आहे. शाहिद आफ्रिदीच्या मते पाकिस्तानी कर्णधाराने यापेक्षा चांगल्या मानसिकतेसह मैदानात उतरले पाहिजे. असे असले तरी, पाकिस्तानने या तिरंगी मालिकेतील सहाव्या सामन्यात बांगलादेशला 7 विकेट्सने मात दिली आहे. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी हा विजय मिळवण्यासाठी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी बाबरच्या त्या वक्तव्यानंतर म्हणाला की, “बाबर आझमला त्याच्या मानसिकतेपेक्षा मोठा विचार करण्याची गरज आहे. जर बाबरने बांगलादेशविरुद्ध 160 धावा करण्याचा विचार करत असेल, तर मोठ्या संघांविरुद्ध कसल्या रणनीतीसह मैदानात उतरेल.”
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. सालामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. त्याने 56 चेंडूत 69 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर दुसरीकडे कर्णधार बाबर आझम 40 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 55 धावा करू शकला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 6 विकेट्सच्या नुकसानावर 173 धावा केल्या. बाबर आणि रिजवानव्यतिरिक्त मोहम्मद नवाज 20 चेंडूत 45 धावा करू शखला. फलंदाजांच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने विजय मिळवला, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. गोलंदाजी विभागात मोहम्मद वसीम आणि नसीम शाहा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
युझवेंद्र चहलला ऑस्ट्रेलियात भेटली जबरा फॅन, जगदुनिया तिला म्हणते ‘लेडी शेन वॉर्न’
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांंनी रोखलं! श्रीलंकेकडून पाकिस्तानचा अवघ्या 1 धावेने पराभव, फायनल भारतासोबत