---Advertisement---

विश्वविजेत्या युवा टीम इंडियाला शुभेच्छा देताना शाहीद कपूरकडून ‘गलती से मिस्टेक’, सोशल मीडियावर जोरदार ट्रोल

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 5:50 PM
Shahid-Kapoor-and-U19-Team India
---Advertisement---

शनिवारी (५ फेब्रुवारी) अँटीग्वा येथे १९ वर्षांखालील विश्वचषकाचा  (U19 World Cup) अंतिम सामना भारत आणि इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. भारताचे १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासातील हे विक्रमी पाचवे विजेतेपद होते. पाच विश्वविजेतीपदं जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे भारताच्या युवा खेळाडूंचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरने देखील भारतीय संघाचे कौतुक केले, पण त्याच्याकडून यावेळी एक चूक झाली. त्यामुळे त्याला ट्रोल व्हावं लागलं. 

झाले असे की, शाहीदने यश धूलच्या नेतृत्त्वातील युवा भारतीय संघाचे कौतुक करताना २०१८ सालच्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचा फोटो शेअर केला. या फोटोत २०१८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकलेला पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ दिसत आहे. फोटोची ही चूक लक्षात येताच शाहीदने लगेचच ती पोस्ट डिलीट केली. पण, तोपर्यंत त्याची ही पोस्ट व्हायरल झाली होती आणि अनेकांनी याचे स्क्रिनशॉट घेतले होते. त्यामुळे तो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाला.

एका युजरने लिहिले की ‘हे काय केलंस… गलती से मिस्टेक’. तर एका युजरने २०२२ वर्ष चालू आहे अशी आठवण करून दिली आहे.

शाहीद कपूर त्याच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटात क्रिकेटपटूची भूमिका निभावणार आहे.

https://twitter.com/castledstub/status/1490189899852820483

भारताचे विक्रमी विजेतेपद 
इंग्लंडने या सामन्यात जेम्स ऱ्यूच्या ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना ४४.५ षटकात सर्वबाद १८९ धावा केल्या होत्या. तसेच भारताला १९० धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून रवी कुमारने ४ आणि राज बावाने ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर १९० धावांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शेख राशिद (५०) आणि निशांत संधू (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४८ व्या षटकात ६ विकेट्स गमावून १९५ धावा करत विजय मिळवला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

यापूर्वी भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

‘बापमाणूस’ गेल्याने सुरेश रैना भावुक, वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

“जर तुम्ही चांगले व्यक्ती असाल तर लोक जवळ करतील आणि..” वाचा असे का म्हणाला विराट कोहली

आयसीसीने निवडला अंडर-१९ वर्ल्डकपचा सर्वोत्तम संघ; यश धूलकडे नेतृत्त्व, तर ‘या’ दोन भारतीयांचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---