आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) दुबईत खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी शेवटच्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका संघांची भिंडत झाली. या सामन्यात श्रीलंकेने 5 विकेट्सने पाकिस्तानला झुकवले. या पराभवाने निराश झालेल्या पाकिस्तान संघासाठी आता आनंदाची बातमी पुढे आली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी हा दुखापतीतून बरा झाला आहे.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) संघात रविवारी आशिया चषकाचा अंतिम सामना (Asia Cup 2022 Final) खेळला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी युवा वेगवान गोलंदाज दहानी (Shahnawaz Dahani) फिट झाला आहे. भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यापूर्वी त्याला दुखापत झाली होती.
साइड स्ट्रेनचा होत होता त्रास
दहानीला साइड स्ट्रेनचा त्रास होत होता. परंतु आता 2 सामने बाहेर बसल्यानंतर त्याने पुरेसा आराम केला आहे व त्याचा त्रास कमी झाला आहे. यानंतर आता त्याने गोलंदाजीचा सराव करायलाही सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या नेट्समध्ये तो जुन्या वेगाने गोलंदाजी करताना दिसला आहे. दहानीच्या पुनरागमनाने पाकिस्तान संघाला भरपूर फायदा होणार आहे. मात्र मोहम्मद हसनैनसाठी दहानीचे पुनरागमन समस्या ठरू शकते. जर दहानी संघात परतला, तर हसनैनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले जाऊ शकते.
आशिया चषकात असे राहिलेय प्रदर्शन
दहानीच्या आशिया चषकातील प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने भारताविरुद्धच्या साखळी फेरी सामन्यात गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत योगदान दिले होते. या सामन्यात त्याने 6 चेंडूत 16 धावा केल्या होत्या. त्याला भारताच्या एकाही फलंदाजाची विकेट घेता आली नव्हती. हाँगकाँगविरुद्ध मात्र त्याने 7 धावा देत 1 विकेट घेतली होती. दहानीने पाकिस्तान संघाकडून आतापर्यंत 2 वनडे आणि 4 टी20 सामने खेळले आहेत.
आशिया चषक 2022साठी पाकिस्तानचा संघ-
मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हसन अली, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान कादिर, हैदर अली, शाहनवाज दहनी, शादाब खान, नसीम शाह
महत्वाच्या बातम्या-
जायचे होते सैन्यात पण गाजवतोय क्रिकेटचे मैदान, वाचा मनीष पांडेचा क्रिकेट प्रवास
‘बारा गावचं पाणी’ पिणारा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू पहिल्यांदाच खेळणार ग्रीनपार्कवर; सचिन अव्वलस्थानी
भारतीय वंशाचे इंग्लंडचे मातब्बर क्रिकेटर, ज्यांच्या नावे सुरू झाली ‘रणजी ट्रॉफी स्पर्धा’, वाचा त्यांच्याबद्दल