यंदाच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) रोमांचक सामने पाहायला मिळले. रविवारी (२७ फेब्रुवारी) पीएसएलचा अंतिम सामना लाहोर कलंदर्स आणि मुलतान सुलतान या संघांमध्ये पार पडला. लाहोर कलंदर्सने हा सामना जिंकत पहिल्यांदाच चॅम्पियन संघ बनला. सामन्यात लाहोर कलंदर्स संघाने मुलतान सुलतानचा ४२ धावांनी पराभव केला. लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) हा सर्वात कमी वयात टी२० लीगचा पुरस्कार जिंकणारा कर्णधार बनला आहे. यापूर्वी स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) २२ वर्षाच्या वयात २०१२ मध्ये सीडनी सिक्सर्स संघाला बिग बॅश लिगचे विजेतेपद जिंकून दिले होते.
लाहोर संघाच्या विजयाचा स्टार मोहम्मद हाफिज बनला. त्याने ४६ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. तसेच त्याने २ विकेट देखील घेतल्या. हाफिजशिवाय हॅरी ब्रूकने शेवटच्या षटकात २२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याने तीन षटकार आणि दोन चौकार मारले. मुलतान संघाकडून आसिफ आफ्रिदीने ३ बळी घेतले. हाफिजच्या दमदार खेळीच्या जोरावर लाहोरच्या संघाने २० षटकांत १८० धावा केल्या. तसेच या सामन्यात सुलतानचा शाहनवाज सुद्धा चर्चेत राहिला. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
"Ijazat hai?" ????#HBLPSL7 l #LevelHai l #MSvLQ I #HBLPSLFinal pic.twitter.com/ryURyCZFuN
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 27, 2022
लाहोर कलंदर्सच्या डावाच्या १८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दहानीने हाफिजला झेलबाद केले. हाफिज झेलबाद होताच शाहनवाज दहानी (Shahnawaz Dahani) पंच अलीम डारजवळ गेला आणि त्याने हात जोडून फलंदाजाला तंबूत पाठवण्याची मागणी केली. पंचानेही तशीच प्रतिक्रिया दिली. त्यांनी हात जोडून फलंदाजाला तंबूत जाण्यास सांगितले. दहानी आणि पंचांमधील हे कृत्या चाहत्यांना खूपच आवडल. पीएसएलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लाहोर संघाने या लीगमध्ये प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. आतापर्यंत इस्लामाबाद युनायटेड संघाने दोनदा विजेतेपद पटकावले आहे. इस्लामाबाद व्यतिरिक्त पेशावर जाल्मी, क्वेटा ग्लॅडिएटर्स, कराची किंग्स, मुलतान सुलतान आणि लाहोर कलंदर्स यांनी प्रत्येकी एकवेळा विजेतेपद जिंकले आहे. मुलतान संघाने २०२१ चा पीएसएल हंगाम जिंकला होता. आता ही लीग संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानी खेळाडू दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-






