---Advertisement---

विश्वचषकापूर्वी स्म्रीती मंधानाच्या तब्येतीबाबत भारतीय संघासाठी खुशखबर; डोक्याला लागला होता वेगवान बाउंसर

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 7:23 PM
Smriti-Mandhana
---Advertisement---

मिताली राजच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या (Women’s Cricket World Cup) तयारीला लागला आहे. पहिल्या सान्याची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाची स्टार खेळाडू स्म्रीती मंधानाला (Smriti Mandhana) या विश्वचषकासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात शबनम इस्माईलचा बाउंसर तिला लागला होता, तेव्हा दुखापत झाल्यामुळे मंधानाला सामन्यातून बाहेर पडावे लागले होते.

आयसीसीच्या अहवालानुसार, या घटनेनंतर संघाच्या डाॅक्टरांनी मंधानाची तपासणी केली. सुरुवातीला तिला खेळत राहण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले. अवघ्या दीड षटकानंतर आणखी एका तपासणीनंतर ती दुखापतग्रस्त झाली. त्यावेळी डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिच्या डोक्याला दुखापत झाल्याची लक्षणे दिसत नव्हती.

या सामन्यात मंधाना चांगली खेळी खेळत होती. तिने न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या एकदिवसीय सामन्यात २० वे अर्धशतक लगावले होते. तिने ६४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतकी खेळींच्या मदतीने २४६१ धावा केल्या आहेत. भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध आणखी एक सराव सामना खेळायचा आहे. हा दुसरा सराव सामना १ मार्चपासून खेळला जाणार आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेसोबत खेळलेला पहिला सराव सामना भारतीय संघाने २ धावांनी जिंकला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात दिप्ती शर्मा ५ धावा करून बाद झाली. कर्णधार मिताली ० धावांवरच तंबूत परतली. भारतीय संघाने हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळी आणि यास्तिका भाटियाच्या ७८ चेंडूत ५८ धावांच्या मदतीने ९ विकेट गमावत २४४ धावा केल्या.  या दोघींनी ८४ धावांची भागीदारी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने सुने लुस आणि लाॅरा वोलवार्टच्या अर्धशतकी खेळीनंतरही विजय मिळवू शकली नाही. डाव्या हाताची फलंदाज राजेश्वरी गायकवाडने ४६ धावा देत ४ विकेट घेतल्या. आता आयसीसी विश्वचषक २०२२ मध्ये कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकेला क्लीन स्वीप देत भारताने लावली विक्रमांची रांग! मायदेशात सर्वाधिक विजयाबरोबरच ‘हे’ पराक्रमही नावावर

टीम इंडिया विजयीरथावर आरुढ! सलग १२ वा टी२० सामना जिंकत ‘या’ दोन संघांची विश्वविक्रमात बरोबरी

तिसऱ्या टी२०साठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितचा विश्वविक्रम, पाकिस्तानच्या शोएब मलिकला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---