रिंकू सिंग इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या फलंदाजांपैकी एक ठरला. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने सलग पाच षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. अशात त्याची सिक्सर किंग अशी ओळखही बनली. आयपीएल संपल्यानंतही रिंकू सिंग चर्चेत आहेत. सोशल मीडियावर शुबमन गिलची बहीण शहनील गिल हिला रिंकूने भुरळ पाडल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
रिंकू सिंग () आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने हंगामातील 14 सामन्यांमध्ये 474 धावा केल्या. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने लागोपाठ पाच षटकार मारून केकेआरला विजय मिळवून दिला, त्यावेळी अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. या वादळी खेळीनंतर रिंकू रातोरात स्टार नबला. अनेक वर्षांची मेहनत रिंकूने त्यादिवशी मैदानात उपयोगात आणली. असे असले तरी, तो आपल्या संघाला आयपीएल प्लेऑफमध्ये जागा मिळवून देऊ शकला नाही. आयपीएल 2023 चे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जने जिंकले.
आयपीएल संपल्यानंतर रिंकू सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शर्टलेस फोटोही शेअर केले आहेत. रिंकूच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. पण एक कमेंट अशा व्यक्तिची आली आहे, ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले. रिंकू सिंगच्या पोस्टवर शुबमन गिल याची बहीन शहनील गिल व्यक्त झाल्याने अनेकांना भुवया उंचावल्या आहेत. एका चाहत्यांनी या कमेंटवर प्रतिक्रिया दिली की, “वहिनी मिळाली वाटतं रिंकू भाई.” चाहत्यांकडून अशाच अनेक कमेंट्स आल्याचे पाहायला मिळते. केकेआरचा कर्णधार नितीष कुमारची प्तनी साची मारवाह हिनेही या पोस्टवर कमेंट केली आहे. साचीने रिंकूच्या पोस्टवर “अच्छा” अशी कमेंट केली आहे. सोबतच हर्टची इमोजीही पोस्ट केली आहे.
https://www.instagram.com/p/CtD7_-ILWC-/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, रिंकू सिंगने आयपीएल 2023मध्ये आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी अवघ्या 50 लाख रुपयांमध्ये त्याला फ्रँचायझीने खरेदी केले होते. हंगामातील आपल्या जबरदस्त प्रदर्शनासाठी फ्रँचायझीकडून त्याला अधिकची बक्षीसे मिळल्याचा अंदाजही चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. (Shahneel Gill’s comment on Rinku Singh’s post is in discussion)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final दोन्ही कर्णधारांसाठी ठरणार खास, रोहित आणि कमिन्स नावावर करणार मोठे विक्रम
सूर्यकुमार यादवला पहिल्यांदा स्काय म्हणून हाक कोणी मारली? डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी भारतीय फलंदाजाकडून मोठा खुलासा