---Advertisement---

आयपीएल लिलावातही शाहरुख ‘सुपरहिट’! तब्बल ९ कोटी रुपयांमध्ये ‘या’ संघात झाला सामील

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 7:59 PM
cricketer-shahrukh-khan
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या लिलावात सर्वाधिक लक्ष असलेला शाहरुख खान याला तब्बल ९ कोटी रुपयांची बोली लागली. यावेळी देखील तो पंजाब किंग्स संघासाठी खेळताना दिसेल.

शाहरूख खान याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स व पंजाब किंग्ज या संघांमध्ये चांगलीच चुरस रंगली. मात्र, पंजाब मे अखेरपर्यंत हार न मानता त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.

 

‘धडाकेबाज’ अभिषेकसाठी पंजाब-हैदराबादमध्ये रंगली चुरस; अखेर मोठ्या रकमेसह… (mahasports.in)

राहुल नाम तो सुना होगा! ९ कोटींची घसघशीत कमाई‌ करत तेवतिया बनला ‘या’ संघाचा भाग (mahasports.in)

चार-चार संघ ज्याच्या मागे धावले ‘तो’ अभिनव सदारंगाणी कोण आहे? (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---