सोमवार रोजी (२२ नोव्हेंबर) दिल्ली येथे तमिळनाडू विरुद्ध कर्नाटक यांच्यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ चा अंतिम सामना पार पडला. या महामुकाबल्यात प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने २० षटकअखेर ७ बाद १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात तमिळनाडू संघाने शेवटच्या चेंडूवर ४ विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. तमिळनाडूकडून शेवटच्या चेंडूवर विजयी षटकात खेचत शाहरुख खानने संघाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद जिंकून दिले. यानंतर आता त्याने आपल्या या विजयी षटकाराबद्दल मोठी प्रतिक्रियाही दिली आहे.
कर्नाटकच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तमिळनाडू संघाला २० व्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. यावेळी साई किशोर आणि शाहरुख खान फलंदाजी करत होते. या षटकातील पहिल्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या साई किशोरने खणखणीत चौकार खेचत संघाला थोडाफार दिला होता. पुढील ४ चेंडूवर साई किशोर आणि शाहरुख खानने १-२ धावा करत आव्हानाच्या नजीक पोहोचण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे अखेरच्या चेंडूवर तमिळनाडूला विजयासाठी केवळ ५ धावा हव्या होत्या. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या विस्फोटक फलंदाज शाहरुखने आक्रमक पवित्रा घेतला आणि चेंडूला जोराने हवेत टोलवत षटकारासाठी पाठवले. त्याच्या या भन्नाट शॉटमुळे तमिळनाडूने तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
सामन्यानंतर आपल्या या षटकारावर प्रतिक्रिया देताना शाहरुख म्हणाला की, “शेवटच्या चेंडूवर षटकार मारणे खरचं खूप शानदार होते. मी माझ्या या षटकाराला कधीही विसरणार नाही. त्यावेळी फलंदाजी करताना माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू होत्या. परंतु मी सर्वकाही सांभाळून घेतले आणि गोष्टी साध्या ठेवण्यावर भर दिला.”
WHAT. A. FINISH! 👌 👌
A last-ball SIX from @shahrukh_35 does the trick! 💪 💪
Tamil Nadu hold their nerve & beat the spirited Karnataka side by 4 wickets to seal the title-clinching victory. 👏 👏 #TNvKAR #SyedMushtaqAliT20 #Final
Scorecard ▶️ https://t.co/RfCtkN0bjq pic.twitter.com/G2agPC795B
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 22, 2021
“त्यावेळी चेंडू थोडा खडबडीत झाला आणि खेळपट्टीची गतीही मंदावली होती. यामुळेच मला माझ्या बॅटच्या मधोमध फटका मारायचा होता. मी लाँग ऑनवरुन षटकार खेच इच्छित होतो. परंतु स्क्वेयर लेगच्या दिशेने शॉट खेळण्यासाठी चेंडू बरोबर माझ्या बॅटवर आल्याने मी त्याला षटकारासाठी टोलवले होते,” असेही त्याने म्हटले.
या सामन्यात तमिळनाडूकडून १५ चेंडूंमध्ये नाबाद ३३ धावा चोपणाऱ्या शाहरुखला या सामन्यात सामानावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तानमध्ये होणार द्विपक्षीय मालिका? ‘या’ ठिकाणी होऊ शकते आयोजन
तमिळनाडूने तिसऱ्यांदा जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, पाहा आजपर्यंतचे विजेते