शाहरुख खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. यासोबतच आता किंग खान आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. वास्तविक, शाहरुख खान आता महिला क्रिकेट संघाचा मालक बनला आहे. काही वृत्तांनुसार, या वर्षी होणाऱ्या महिला कॅरेबियन प्रीमियर लीग (डबल्यूसीपीएल) च्या उद्घाटनात नवीन महिला संघ सहभागी होणार आहे. याशिवाय एप्रिलमध्ये ग्रेटर लॉस एंजेलिसमध्ये जागतिक दर्जाचे स्टेडियम तयार करण्यासाठी त्याचा क्रिकेट संघ पुढाकार घएील असीही माहिती मिळत आहे.
शाहरुख खानची पोस्ट
शाहरुख खान याबाबत ट्विट करताना म्हणाला की, ३०ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या डबल्यूसीपीएल मध्ये महिला संघाचा थेट सामना पाहण्यासाठी तो उत्सुक आहे. ट्विटरवर आपला उत्साह शेअर करताना त्याने लिहिले, “@KKRiders @ADKRiders वर आपल्या सर्वांसाठी आणि अर्थातच @TKRiders वरील लोकांच्या सुंदर सेटसाठी हा आनंदाचा क्षण आहे. आशा आहे की मी ते थेट पाहण्यासाठी तिथे असू शकते!!”
This is such a happy moment for all of us at @KKRiders @ADKRiders & of course the lovely set of people at @TKRiders Hope I can make it there to see this live!! https://t.co/IC9Gr96h92
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 17, 2022
दरम्यान, शाहरुख खान आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आजवर आयपीएलमध्ये दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. मध्यंतरी काही काळापासून शाहरुख क्रिकेट ग्राऊंडवर सामने पाहण्यासाठी कमी प्रमाणात आल्याचे दिसून आले. त्यामुळए अनेकांनी शाहरुख क्रिकेटपासून दूर गेला असल्याची संभावना व्यक्त केली होती. मात्र, आता शाहरुखने नव्या संघाचे मालकीहक्क जाहिर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आनंद गगनात मावेना! तब्बल २३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला ‘हा’ संघ
‘अब खेलने का नहीं *** का टाईम है’, दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून वीरूही झाला फॅन
भुवीच्या बाऊंसरनंतर आफ्रिकेचा कर्णधार गारद, रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला