काहीदिवसांपूर्वीच तमिळनाडू संघाने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात कर्नाटकचा अखेरच्या चेंडूवर पराभूत करत तमिळनाडूने हा विजय नोंदवला. तमिळनाडूच्या विजयाचा नायक शाहरुख खान ठरला. तामिळनाडूला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती आणि स्ट्राईकवर शाहरुख खान होता. त्याने यावेळी षटकार खेचला आणि तमिळनाडूच्या विक्रमी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने १५ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या, त्यात ३ षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता.
शाहरुख खानने आपल्या सामना फिनिश करण्याच्या कौशल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितलं की आयपीएल दरम्यान त्याने एमएस धोनीकडून टिप्स घेतल्या होत्या. एमएस धोनीने शाहरुख खानला असं सांगितलं होतं की स्वतःवर विश्वास ठेव.
शाहरुख खानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये एमएस धोनीसारखा षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याची सध्या खूप स्तुती होत आहे. विशेष म्हणजे त्याचा हा षटकार धोनीने देखील पाहिला. तो शाहरुखला पाहात असतानाचा फोटो चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला होता.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकला ४ गडी राखून हरवले. पहिले फलंदाजी करून कर्नाटकाला ७ गडी बाद १५१ धावा बनवता आल्या. बदल्यात तामीळनाडूने ६ बाद १५३ करून विजय प्राप्त केला.
ह्या सामन्यानंतर शाहरुखने मोठा खुलासा केला आणि म्हणाला आयपीएलदरम्यान त्याने एमएस धोनीकडून टिप्स घेतल्या होत्या.
शाहरुख खान म्हणाला, ‘एमएस धोनीने मला स्पष्टरित्या फिनिशरची भूमिका सांगितली होती. त्याने सांगितलं होतं की त्यादिवशी तू जे काही करशील ते स्वतःवर विश्वास ठेवून कर. कारण तेव्हा फक्त तुलाच माहित असणार तुझ्या डोक्यात काय चालू आहे. फिनिशरची भूमिका बजावणं, हे कठीण काम असतं. कारण जर तो ते करू शकला, तर त्याची स्तुती होणार आणि नाही करू शकला तर टीका देखील होणार.’
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने निवडली ऑस्ट्रेलियाची सर्वकालिन सर्वोत्तम संघ, ‘या’ खेळाडूला केले कर्णधार
वनडे कारकिर्दीत सर्वाधिक धावा देणारे ३ भारतीय गोलंदाज
आपल्या कामगिरीचा जगभर डंका वाजवूनही भारताचे नेतृत्त्व करण्याची संधी न मिळालेले ३ दिग्गज