पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. शोएब अख्तरने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडूलकरबद्दल मला याआधी काहीही माहीत नव्हते, असे त्याने म्हटले आहे. त्याच्या संघाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने त्याला सचिन किती मोठा खेळाडू आहे हे सांगितले होते.
सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर यांच्यातील लढाई नेहमीच प्रेक्षणीय असायची. दोन्ही खेळाडूंना एकमेकांविरुद्ध चांगली कामगिरी करायची होती. कधी सचिन तेंडुलकरला यश मिळायचे तर कधी शोएब अख्तरला यश मिळायचे. मात्र, शोएब अख्तर म्हणतो की, “जेव्हा तो क्रिकेट जगतात उदयास आला तेव्हा सचिन तेंडुलकर कोणत्या स्तराचा आहे हे मला माहीत नव्हते. सचिनला त्याचा सहकारी सकलेन मुश्ताकने त्याच्याबद्दल सांगितले होते.”
स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “सकलेन मुश्ताकने मला सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कामगिरीबद्दल सांगितले. मी त्याला ओळखत नव्हतो. मी माझ्याच विश्वात हरवलो होतो. त्यामुळेच मला काही कळले नाही. मी काय करणार आहे आणि फलंदाज काय विचार करत आहे, एवढेच मला माहीत होते.”
दरम्यान, आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय खेळाडूही त्याच्या तयारीत गुंतले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वेळी आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात बांगलादेशचा पराभव करून संघाने विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने गेल्या वेळी दोन वेळा पाकिस्तानचा पराभव केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गप्टीलने रोहितचा बदला विंडीज विरुद्धच घेतला, वाचा कसं आहे कनेक्शन
मार्कस स्टॉयनिसने उडवली पाकिस्तानी गोलंदाजाची खिल्ली! व्हिडिओ तुफान व्हायरल
मिशन गोवा टू टीम इंडिया! मुंबईकडून किमान संधी मिळालेला अर्जुन स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घेतोय मेहनत