बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब उल हसनने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना जेव्हा १७वी धाव घेतली तेव्हा एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. या खेळाडूने वनडेत वेगवान ५ हजार धावा आणि २०० विकेट्स करण्याचा विक्रम केला आहे.
शाकिबने ही कामगिरी केवळ १७८ वनडेत केली असून त्यासाठी त्याला १६८ वनडे डाव खेळावे लागले.
वनडेत ५००० धावा आणि २०० विकेट्स घेणारा तो केवळ ५वा खेळाडू आहे. यापूर्वी सनथ जयसूर्या, शाहिद आफ्रिदी, अब्दुल रझ्झाक आणि जॅक कॅलिस यांनी अशी कामगिरी केली आहे.
तमाम इक्बालनंतर बांग्लादेशकडून वनडेत ५ हजार धावा करणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे.