---Advertisement---

टी20 क्रिकेटमधील ‘न भूतो’ कामगिरी शाकिबच्या नावे; इतिहासात आजवर कोणीच पोहोचले नाही जवळपास

On: रविवार, ऑक्टोबर 9, 2022 2:57 PM
---Advertisement---

सध्या न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड,‌ पाकिस्तान व बांगलादेश यांच्या दरम्यान टी20 मालिका खेळली जात आहे. रविवारी (9 ऑक्टोबर) न्यूझीलंड व बांगलादेश यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.

ख्राईस्टचर्च येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात बांगलादेशचे नेतृत्व करत असलेल्या शाकिबने प्रथम फलंदाजी करताना 16 चेंडूंमध्ये 16 धावांचे योगदान दिले. त्यानंतर त्याने गोलंदाजी देखील केली. याच दरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कोणीही न केलेला विक्रम आपल्या नावे केला. शाकिब हा आता आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 डावात फलंदाजी करणारा व 100 डावात गोलंदाजी करणारा एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.

शाकिबने आपल्या आतापर्यंतच्या 101 टी20 सामन्यांच्या कारकिर्दीत 2000 पेक्षा जास्त धावा आणि 122 बळी मिळवले आहेत. तसेच तो अष्टपैलू खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रथम क्रमांकावर राहिला होता.

पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना पाकिस्तानने पराभूत केले होते. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सर्व फलंदाजांच्या थोड्याफार योगदानाच्या जोरावर‌ 137 धावा केल्या होत्या. बोल्ट, साऊदी, सोढी व ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी डेवॉन कॉनवेने नाबाद 70 धावांची खेळी केली. केन विल्यमसन व ग्लेन फिलिप्स यांनी उपयुक्त योगदान देत संघाला आठ गड्यांनी विजय मिळवून दिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: रांची वनडेत नाण्याचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
सरावाचा श्रीगणेशा! ऑस्ट्रेलियाला पोहोचताच विराट-राहुलने गाळला घाम; तुम्हीही पाहा व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---