शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा बांगलादेश संघाचा दिग्गज खेळाडू आहे. त्याने गेली अनेक वर्ष बांगलादेश संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे.फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, या दोन्ही क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करत त्याने बांगलादेश संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. तब्बल १५ वर्ष बांगलादेश संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.(Bangladesh cricket board)
शाकीब अल हसनने २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हापासून तो बांगलादेश संघासाठी वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेट खेळतोय. यादरम्यान त्याने अनेक मोठ मोठे विक्रम देखील आपल्या नावावर केले आहेत. परंतु आता त्याच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
ढाकामध्ये असलेल्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना शाकीब अल हसनने म्हटले की, “मला माहित आहे की, कुठल्या स्वरूपाला किती महत्व द्यायचं. आता माझी कसोटी क्रिकेटबद्दल निर्णय घेण्याची वेळ आली आहे. हे खरं आहे. मी कसोटी क्रिकेट खेळणार की नाही आणि जर खेळतोय तर सर्व स्वरूपात कसं खेळणार. मला या गोष्टीचा देखील विचार करावा लागेल की, मला वनडे क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे का. माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये.”
“मी हे मुळीच म्हणत नाहीये की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेन. असे ही होऊ शकते की, मी २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर टी२० खेळणं बंद करेल. मी कसोटी आणि वनडे क्रिकेट खेळणार. परंतु तिन्ही स्वरूपात खेळणं जरा कठीण आहे. ४०-४२ दिवसात दोन कसोटी सामने खेळणे फायदेशीर नव्हते. निश्चितच मी बीसीबीसोबत चांगली योजना बनवून पुढे जाण्याचा विचार करेन. असे करणे समजदारीचे ठरेल. जर हे जानेवारीमध्ये झाले, तर मला कळेल की मला वर्षभर काय करायचं आहे.” असे शाकीब अल हसन म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पाहा वेळापत्रक
हे नक्की पाहा: