---Advertisement---

ढाकाच्या मैदानावर शाकिबचा इतिहास, वसीम अक्रम आणि वकार युनिस यांना पाडले मागे

On: रविवार, डिसेंबर 4, 2022 5:19 PM
Shakib Al Hasan
---Advertisement---

सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसाय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 4 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेेला. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत 186 धावांवर सर्वबाद झाला. शाकिबने विराट आणि रोहितची लागोपाठ विकेट घेत भारतीय संघाला अडचणीत टाकले. बांगलादेश संघासाठी शाकिब अल हसन याने 5 विकेट्स घेत एका विक्रमाला गवसणी घातली आहेे. त्याने एकाच मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

एकाच मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बांगलादेशच्या शाकिब अल हसन (Shakib Al hasan) याने पहिले स्थान प्राप्त केले. भारतााविरुद्ध रविवारी खेळलेल्या सामन्यात त्याने 5 विकेट्स मिळवल्या होत्या. त्याने आतापर्यंत ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडीयमवर 125 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या खालोखाल पाकिस्तानच्या वसीम अक्रम (Wasim Akram) याचा क्रमांक लागतो. अक्रमने शारजाह येथे 122 विकेेट्स घेतल्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा वकार युनिस (Waqar Younis) हा आहे. त्याने शारजाह येथील मैदानावर 114 विकेट्स घेतल्या.

बांगलादेश विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. भारताची सुरुवात निराशजनक झाली. भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) लवकर बाद झाला आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील 31 चेंडूत 27 धावा करत बाद झाला.15 षटकांच्या आतच भारताने आपले 4 गडी गमावले होते. शाकिबच्या एकाच षटकात विराट आणि रोहितला बाद केले होते. मधल्या फळीत फंलदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केेला, पण श्रेयस अय्यर 24 धावा करत बाद झाला. केएल राहुलने एकाकी झुंज दिली. राहुल 73 धावा करत बाद झाला आणि भारतीय संघाचा डाव 186 धावांवर गडगडला. बांगलादेश संघासाठी शाकिब अल हसन याने 36 धावा देत 5 गडी बाद केले.(Shakib Al Hasan Has created history in Dhaka and became bowler to take most wickets on single ground)

एकदिवसीय सामन्यात एकाच मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
शाकिब अल हसन (बांगलादेश)- 125 विकेट्स, ढाका
वसीम अक्रम (पाकिस्तान)- 122 विकेट्स, शारजाह
वकार युनिस (पाकिस्तान)- 114 विकेट्स, शारजाह

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिज चारीमुंड्या चीत! यजमानांचा पर्थ कसोटीवर 164 धावांनी कब्जा
सलामीपेक्षा मध्यक्रमात राहुल गोलंदाजांसाठी जास्त घातक! ‘अशी’ आहे आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---