बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या तीन सामन्यांची वनडे खेळली जात आहे. या वनडेचा अंतिम आणि तिसरा सामना बुधवारी(२३ मार्च) दक्षिण आफ्रिकेच्या सेंचूरियन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापुर्वी संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन हा बांग्लादेशला परतणार असल्याची मोठी बातमी समोर आली होती, परंतु तो आता त्याचे कुटुंब आजारी असून देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरी वनडे खेळणार आहे.
शाकिब अस हसनने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला हा दौरा मध्येच सोडण्याची परवानगी मागितली होती. त्याच्या या मागणीला बोर्डाने स्विकृती दिली. परंतु त्यानंतर त्याने स्वत:च माघारी जाण्यास नकार दिला. त्यामुळे तो आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरी वनडे खेळताना दिसणार आहे.
बांग्लादेश क्रिकेट ऑपरेशंस कमेटीचे अध्यक्ष जलाल यूनुस यांनी सुरुवातीला सांगितले की, “या विषयावर त्यांची शाकिब हसनसोबत बोलणे झाले आहे. त्याच्या कूटुंबातील अनेक सदस्य आजारी आहेत, ज्यामध्ये ३ लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. तो आता तेव्हाच खेळेल जेव्हा परिस्थिती नियंत्रित असेल. परंतु आता बातमी समोर आली आहे की, शाकिब बांग्लादेशला परतणार नसून तिसरी वनडे खेळणार आहे.”
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात असून मालिकेचा पहिली वनडे बांग्लादेश संघाने जिंकली तर दूसरी वनडे दक्षिण आफ्रिकेने जिंकली. पहिल्या वनडेत बांग्लादेशने प्रथम खेळत ३०० हून अधिक धावा केल्या. परंतु दूसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या संघाला २७६ धावांवर रोखले. दुसऱ्या वनडेत बांग्लादेशने १९४ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने ३७.२ षटकात त्यांचे लक्ष्य गाठले होते. मालिकेतील तिसरी वनडे २३ मार्चला होणार आहे.
शाकिब अल हसनची कामगिरी
दरम्यान शाकिब अल हसनने फलंदाजी करताना वनडे क्रिकेटमध्ये ५९ सामन्यांत ४०२९ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२० सामन्यांत ६७३७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये ७१ सामन्यांत ७९३ आणि ९६ टी२० सामन्यांत १९०८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत ५९ वनडे सामन्यांमध्ये २१५ विकेट्स घेतल्या आहेत आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२० सामन्यांत २८३ विकेट्स तर ९६ टी २० सामन्यांमध्ये ११९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाने जिंकली टॉपची लढत, अजेय दक्षिण आफ्रिकेला नमवत लगावला विजयाचा ‘सिक्सर’
महिला विश्वचषक : दुबळ्या बांगलादेशला हरवत भारताने उपांत्य फेरीच्या आशा ठेवल्या जिवंत
Photo | ‘मिशन आयपीएल’साठी विराट कोहली सज्ज, आरसीबीच्या कँपमध्ये केले आगमन