बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने त्याच्यावर लागलेल्या बंदीच्या समाप्तीनंतर बंगबंधू टी-20 स्पर्धेतून पुनरागमन केले आहे. परंतू या स्पर्धेतील अंतिम सामन्यात शाकिब खेळताना दिसून येणार नाही. यूएसमध्ये सासरच्या लोकांसोबत गेल्यामुळे शाकिब बंगबंधू टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे.
जेमकॉन खुलनाचा मॅनेजर म्हणाला, “शाकिबला काल रात्रीच समजले की त्याचे सासरे आजारी आहेत आणि त्यांची तब्येत खूप गंभीर आहे. त्याने हॉटेल सोडले आहे आणि त्याने यूएससाठी भरारी घेतली आहे.” परंतू देशांतर्गत टी-20 स्पर्धेत शाकिब अल हसन प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता.
शाकिबची फलंदाजीत राहिली खराब कामगिरी
शाकिबचे बंगबंधू टी-20 स्पर्धेत गोलंदाजीचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. मात्र, फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी खराब राहिली आहे. त्याने 34 षटकात 6 च्या इकॉनॉमीने 204 धावा देताना 6 बळी मिळवले. पण फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला. शाकिबने 9 डावात खेळताना फक्त 110 धावा काढल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 121 चा राहिला.
वेस्ट इंडिजचा संघ जेव्हा बांगलादेश दौर्यावर येईल, त्यावेळी शाकिब अल हसनची कामगिरी महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण त्याच्या कामगिरीवरून संघाची हार जीत होण्याच्या जास्त शक्यता दिसून येऊ शकते. शाकिबमध्ये चांगली कामगिरी करण्याची धमक आहे. परंतु त्याला सूर गवसण्यासाठी वेळ लागू शकतो. शाकिब पहिल्याप्रमाणे फलंदाजी करताना दिसत नाही. आयसीसीने लावलेली बंदी संपल्यानंतर त्याने सराव केला आणि बंगबंधू टी-20 स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
नववर्षात वेस्ट इंडिज करणार बांगलादेशचा दौरा, ‘या’ कारणामुळे टी२० मालिका रद्द
“बुमराह एकटाच मालिकेत फरक निर्माण करू शकतो”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली स्तुती