सध्या बांगलादेश क्रिकेटमधील वाद चांगलाच विकोपाला जाताना दिसत आहे. आगामी विश्वचषक संघात संधी न मिळाल्याने माजी कर्णधार व अनुभवी सलामीवीर तमिम इक्बाल याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड व संघ व्यवस्थापनावर काही गंभीर आरोप केले आहेत. आता बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने पुढे येत त्या आरोपांवर उत्तर दिले असून, त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचे देखील नाव यावेळी घेतले.
दोन महिन्यांपूर्वी तमिम याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देत निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, एकाच दिवसात त्याने हा निर्णय फिरवला. त्यानंतर झालेल्या कोणत्याही मालिका व स्पर्धेत त्याला बांगलादेश संघात निवडले गेले नाही. तसेच विश्वचषकात देखील तो खेळताना दिसणार नाही. आपल्याला डावलण्याचे कारण सांगताना त्याने, बोर्डाने आपल्याला सलामी सोडून इतरत्र खेळण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावर बोलताना विद्यमान कर्णधार शाकिब म्हणाला,
“रोहित शर्मा सारख्या खेळाडूने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सातव्या क्रमांकावरून केली होती. आज त्याच्या नावे वनडे दहा हजार धावा आहेत. तो कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या क्रमांकावर देखील खेळला होता. क्रमांक हा खरंच अडचणीचा असतो का? हा अत्यंत पोरकटपणा वाटतो. ही माझी बॅट आहे आणि मी खेळणार. एक खेळाडू म्हणून संघासाठी तुम्ही कोणत्याही क्रमांकावर खेळायला हवेत.”
तमिम याने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, मला संघ व्यवस्थापनाने मधल्या फळीत खेळण्याचा सल्ला दिला होता. मी या स्थितीत कधीही खेळलो नाही. मला या गोष्टीचा राग आलेला.
(Shakib Al Hasan Slams Tamim Iqbal Give Rohit Sharma Example)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
Breaking: बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा