MP Shakib Al Hasan: बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याची आता नवीन ओळख निर्माण झाली आहे. कारण आता तो एका पक्षाचा खासदार झाला आहे. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यानी मोठा विजय नोंदवला आहे. बांगलादेशमध्ये रविवारी (7 जानेवारी) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात साकिबने आपल्या देशाच्या संसदेत दणदणीत विजय मिळवला. पंतप्रधान शेख हसीना पुन्हा एकदा सत्तेत आल्या आहेत. त्या पाचव्यांदा पंतप्रधान होणार आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब अल हसन (Shakib Al Hasan) याने शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगकडून निवडणूक लढवली होती. त्याने पश्चिमेकडील मागुरा शहरात विजय मिळवला. साकिबचा जन्मही मागुरा येथे झाला आहे. त्यानी त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा दीड लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव करत हा निवडणूक जिंकली आहे. जिल्हा मुख्य प्रशासक अबू नासेर बेग यांनी याची माहिती दिली आहे. (shakib al hasan wins bangladesh parliament seat from magura western town)
मिळालेल्या माहितीनुसार, शाकिब अल हसनने निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार काझी रेझुल यांचा पराभव केला आहे. साकिबला एकूण 1,85,388 मते मिळाली. तर काझी यांना 45,993 मते मिळाली. निवडणुकीच्या निकालापूर्वी मीडियाशी संवाद साधताना 36 वर्षीय क्रिकेटपटूने निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त केला होता. दरम्यान, शाकिबचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला कानाखाली मारताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे हे कळू शकलेले नाही.
Shakib Al Hasan slapped a fan..!pic.twitter.com/KaUbabgkCX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 7, 2024
शाकिबने कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांत राजकारणात येण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. यासाठी त्याने क्रिकेटमधून तात्पुरती रजाही घेतली होती. 2023 च्या विश्वचषकात बांगलादेशच्या पराभवानंतर त्याने हा ब्रेक घेतला. मात्र, शाकिबने सध्या निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे.
Bangladesh: Cricketer and Awami League candidate Shakib Al Hasan served beef to Hindu workers. He then warned them of dire consequences if they disclosed it. Without IPL, Shakib Al Hasan would be pulling a riksha in Delhi's Seelampur.https://t.co/FmInRj0WdV
— Rakesh Krishnan Simha (@ByRakeshSimha) January 7, 2024
शाकिब हा मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. तो एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल आहे. तर तो कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. शाकिबने 66 कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने 4454 धावा केल्या आहेत, तर शकिबने आपल्या देशासाठी 364 पांढऱ्या चेंडूचे सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 9952 धावा केल्या आहेत आणि 457 विकेट्स घेतल्या आहेत. (MP Saab The cricketer who made Team India cry became an MP reached the Lok Sabha with a resounding victory)
हेही वाचा
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जिंकली डी वाय पाटीलची खेळपट्टी, टी-20 मालिकेतील पाहुण्यांचा पहिला विजय
पोलार्डच्या नाराजीचे कारण समजले, मुंबई फ्रँचायझीमुळेच ठेवली ‘ती’ इंस्टाग्राम स्टोरी