बांगलादेश आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशने आपला संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनचा समावेश करण्यात आलेला असून, शाकिब जवळजवळ चौदा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.
29 सप्टेंबर 2019 रोजी भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शाकिबवर आयसीसीने एका वर्षाची बंदी लावली होती. शाकिबने मागील काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमधील स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. शाकीबच्या आंतररष्ट्रीय सामन्यातील पुनरागमनाने निश्चितच त्याच्या सर्व चाहत्यांना आनंद झाला असेल.
शाकिबबद्दल बोलताना बांगलादेश संघाचे मुख्य निवडकर्ता मिनाजुल अबेदिन म्हणाले, “शाकिबच्या पुनरागमनाने संघ मजबूत झालेला आहे. आम्हा सर्वांना आशा आहे की शाकिब लवकरच आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये येईल.”
बांगलादेशने जाहीर केलेल्या 18 खेळाडूंच्या यादीत माजी कर्णधार मशरफे मोर्ताजा, शफिउल इस्लाम, अल अमीन हुसैन आणि नईम शेख यांचा समावेश करण्यात आलेला नाही. बांगलादेशने आपल्या वनडे संघाचे कर्णधारपद अनुभवी फलंदाज तमिम इक्बालकडे सोपवले आहे. मशरफे मोर्ताजाच्या एका प्रदीर्घ कार्यकाळानंतर बांगलादेश क्रिकेट प्रेमींना आशा असेल की तमिमच्या नेतृत्व देखील बांगलादेश संघ उत्तम कामगिरी करेल.
बांगलादेश संघ –
तमीम इक्बाल (कर्णधार), शाकिब अल हसन, नजमुल हुसेन शान्तो, मुश्फिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, महमूदुल्ला, आफिफ हुसेन, सौम्य सरकार, तस्कीन अहमद, रुबेल हुसेन, तैजुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, महादी हसन, हसन महमूद, शॉरीफुल इस्लाम
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाला कमी लेखणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा ‘यू-टर्न’; आता करतोय तोंडभरुन कौतुक
ऑस्ट्रेलिया संघासाठी ३३ आकडा आहे अशुभ, जाणून घ्या काय आहे कारण
हे काय नविनच! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान स्टार वॉर्सच्या वेशात दिसले दर्शक, फोटो तूफान व्हायरल