श्रीलंका येथे होणाऱ्या आगामी निदहास ट्रॉफी तिरंगी मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. या 16 जणांच्या संघात शाकिब अल हसनची कर्णधार तर महमुदूल्लाची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
मोहम्मद सैफुद्दीन, महेदि हसन, झाकीर हसन व अफिफ हुसेन हे चार नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूध्द दोन टी20 सामन्यात होते म्हणून त्यांना निदहास ट्रॉफीच्या संघातून वगळले आहे.
याउलट सलामीचा फलंदाज इम्रूल कायेस, नुरूल हसन सोहन, मेहेदी हसन मिराज व तस्किन अहमद यांना संघात परत घेण्यात आले असून त्यांची आगामी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
निदहास ट्रॉफी 2018 श्रीलंकेत 6 मार्च पासून सुरू होत असुन त्यात श्रीलंका भारत व बांगलादेश आहे. 8 मार्च रोजी बांगलादेश विरूध्द भारत सामना होणार आहे. सहभागी संघाचे प्रत्येकी चार सामने होणार असुन अंतिम सामना 18 मार्चला आहे. यावेळी बांगलादेशचे प्रशिक्षक म्हणून इंडीजचे महान खेळाडू कर्टनी वॉल्श हे या स्पर्धेत काम पाहतील.
सगळे सामने हे कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणर आहे.
निदहास ट्रॉफीसाठी बांगलादेश टी20 संघ – शाकिह अल हसन (कर्णधार), महमुदूल्ला रीयाध( उपकर्णधार), तमिम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रूल कायेस, मुशफिकर रहीम, नुरूल हसन सोहन, मेहेदी हसन मिराज, सब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रूबेल हुसेन, अबू हैदर रोनी, अबू जायोद राही, अरूफुल हक आणि नाझमुल इस्लाम अपू
निदहास ट्रॉफी 2018 सामने
6 मार्च 2018 श्रीलंका विरूध्द भारत
8 मार्च 2018 भारत विरूध्द बांगलादेश
10 मार्च 2018 श्रीलंका विरूध्द बांगलादेश
12 मार्च 2018 श्रीलंका विरूध्द भारत
14 मार्च 2018 भारत विरूध्द बांगलादेश
16 मार्च 2018 श्रीलंका विरूध्द बांगलादेश
18 मार्च 2018 अंतिम सामना