गयाना येथे होत असलेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. पहिल्या डावातच यजमान संघाचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने पाच विकेट घेत शानदार पुनरागमन केले. यानंतर विआन मुल्डरने अवघ्या 18 धावांत 4 बळी घेतले. महत्त्वाचे म्हणजे, एकाच दिवसात एकूण 17 विकेट पडल्या, जो गयानामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सर्वाधिक बळी पडण्याचा विक्रम आहे.
पहिल्या कसोटीमधील त्रिनिदादच्या संथ खेळपट्टीच्या विरूद्ध, गयानामध्ये सामना खूप वेगवान झाला. दोन्ही कर्णधारांना प्रथम फलंदाजी करण्याची इच्छा होती. मात्र गोलंदाजांसाठी, विशेषत: वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी खूप छान खेळली. वेगवान गोलंदाजांनी एकूण 82.2 षटके टाकली आणि 68 धावांत 15 बळी घेतले. तत्तपूर्वी, दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या डावात फलंदाजी करताना पाहुण्या संघाने चौथ्या षटकातच पहिली विकेट गमावले. यानंतर शामर जोसेफने धोकादायक गोलंदाजी करत आफ्रिकेच्या फलंदाजांना क्रीजवर टिकू दिले नाही. जोसेफने एडन मार्करामला इनस्विंगने पायचीत केले आणि त्यानंतर अवघ्या दोन चेंडूंत त्याने टेंबा बावुमाला बाद केले. पहिल्या ड्रिंक्स ब्रेकवर दक्षिण आफ्रिकेने 3 गडी गमावून 20 धावा केल्या.
FIVE-WICKET HAUL FOR SHAMAR JOSEPH…!!!!
– What a spell, he has dominated the South African batting unit, they are 97 for 9 in the first innings. 🤯 pic.twitter.com/FI7CuOpsha
— Johns. (@CricCrazyJohns) August 15, 2024
नंतर दक्षिण आफ्रिकेसाठी, डेन पीट आणि नांद्रे बर्गर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 10व्या विकेटसाठी 63 धावांची विक्रमी भागीदारी केली. डॅन पीटने सर्वाधिक 38 धावांची खेळी खेळली. जोसेफने 14 षटकात 33 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. जेडेन सील्सच्या नावावर तीन विकेट्स होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. आफ्रिकेने पहिल्या डावात 160 धावा केल्या.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वेस्ट इंडिजने पहिली विकेट गमावली. मायकेल लुईस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. क्रेग ब्रॅथवेटला केवळ तीन धावा करता आल्या. केसी कार्टीने 26 धावांचे योगदान दिले. केवळ 47 धावांत 5 विकेट्स अशी स्थिती असताना, जेसन होल्डरने दक्षिण आफ्रिकेला कडवी झुंज दिली. मोतीसोबत सातव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच गुडाकेश मोती 11 धावा करून बाद झाला.
जेसन होल्डर 33 धावा करून नाबाद परतला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 97 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. ते दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावापेक्षा 63 धावांनी मागे आहे. आफ्रिकेकडून विआन मुल्डरने चार विकेट घेतल्या. नांद्रे बर्गरने दोन गडी बाद केले.
हेही वाचा-
आयपीएलचा रोमांच आणखी वाढणार, बीसीसीआयने बनवली नवी योजना! पाहा होणारे बदल
टीम इंडियाला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक; हेड कोच गंभीरच्या ‘निर्णयावर’ जय शहांची मोठी प्रतिक्रिया
रोहित-विराट दुलीप ट्रॉफी स्पर्धेत का खेळणार नाहीत? जय शहांनी सांगितले खरे कारण