जानेवारी 2024 मध्ये शमर जोसेफ याने वेस्ट इंडीजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात त्याने अशी कामगिरी केली की, तो जगाभरात चर्चेचा विषय ठरला. जोसेफच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाच्या हातून ब्रिसबेन कसोटी हिसकावली. मागच्या एका महिन्यात जोसेफचे प्रदर्शन इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जबरदस्त राहिले. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयीसीने जोसेफला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केला.
2024 वर्षातील पहिला प्लेअर ऑफ द मंथ (ICC Player of the Month) पुरस्कार वेस्ट इंडीजच्या शमर जोसेफ (Shamar Joseph) याला मिळाला. 24 वर्षीय वेगवान गोलंदाजाने क्रिकेट कारकिर्द घडवण्यासाठी आपला जॉब सोडला होता. त्याचा हा निर्णय आता योग्य ठरल्याचे दिसते. प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी जोसेसोबत इंग्लंडचा धडाडीचा फलंदाज ओली पोप आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड या दोघांनामी नामांकने मिळाली होती. पण जोसेफने पोप आणि हेजलवूड यांना पछाडत कारकिर्दीतील पहिला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार नावावर केला. विशेष म्हणजे हा पुरस्कार जिंकणारा जोसेफ पहिलीच कॅरेबियन क्रिकेटपटू ठरला आहे.
Shamar Joseph becomes the FIRST West Indies player to win ICC men’s Cricketer of the Month award. pic.twitter.com/sLLsP8NENN
— Kausthub Gudipati (@kaustats) February 13, 2024
शमर जोसेफ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघे दोन सामने खेळून पूर्ण केले आहेत. या दोन सामन्यांमध्येच त्याने प्लेअर ऑफ द मंथपर्यंत बाजी मारली. कारकिर्दतील पहिला सामना त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी फॉरमॅटमध्ये खेळला. कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या स्टीव स्मिथ याची विकेट घेतली. कारकिर्दीतील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात जोसेफने 5 विकेट्स नावावर केल्या होत्या. तसेच पहिल्या डावात 36 धावांची खेळी देखील केली होती. कारकिर्दीतील दुसऱ्या डावात त्याने बॅटने 15 धावा केल्या, तर गोलंदाजीत त्याला एकही विकेट मिळाली नाही. अवघी 1.4 षटके गोलंदाजी करण्याची वेळ त्याच्यावर दुसऱ्या डावात आली होती.
कारकिर्दीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात शमर जोसेफ सर्वांचे लक्ष वेधताना दिसला. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिसबेनमध्ये होता. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 1/56 असे, तर दुसऱ्या 7/67 असे जबरदस्त प्रदर्शन केले. दुसऱ्या डावात त्याने घेतलेल्या सात विकेट्समुळे वेस्ट इंडीजने हा सामना 8 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी देखील केली. शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाला 215 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांच्यासाठी जास्त कठीण नव्हते. पण जोसेफच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक विकेट गमावत राहिले. परिणामी या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
मागच्या महिन्यात खेळलेल्या या दोन कसोटी सामन्यात जोसेफेने 13 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याची सरासरी 17.30 होती, तर इकोनॉमी रेट 5.05 होता.
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये! आता रणजी ट्रॉफीला पर्याय नाही, ईशानसह इतर काही खेळाडूंना केल्या सुचना
Dattajirao Gaekwad । भारताच्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ‘या’ वर्षी घेतला जगाचा निरोप