इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगाम अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. सर्व संघ आगामी आयपीएल हंगामासाठी तयारीला लागताना दिसत आहे. खेळाडूंनीही सरावाला सुरुवात केली आहे. अशातच लखनऊ सुपर जायंट्सच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. वेगवान गोलंदाज मार्क वूड याच्या जागी वेस्ट इंडीजचा युवा वेगवान गोलंदाज शमर जोसेफ लखनऊ सुपर जायंट्ससाठी आगामी आयपीएल हंगाम खेळणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) हंगामाची सुरुवात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या हंगामात मार्क वुड () लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळणार नाही. त्याच्या जागी वेस्ट इंडीजचा शमर जोसेफ संघासाठी गोलंदाजी करेल. जोसेफला खरेदी करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्सने 3 कोटी रुपये मोजले आहेत. युवा कॅरेबियन गोलंदाजासाठी ही रक्कम नक्कीच मोठी आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत पेजवर याविषयी माहिती माहिती दिली गेली आहे.
शमरने आपला शेवटचा कसोटी सामना ब्रिसबेनच्या गावा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी फॉरमॅटमध्ये खेळला. या सामन्यात त्याने एकूण 12 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात 5, तर दुसऱ्या डावात 7 विकेट्स त्याने नावावर केल्या आणि हा सामना वेस्ट इंडीजला जिंकवून दिला. या जबरदस्त प्रदर्शनासाठी 24 वर्षीय वेगवान गोलंदाजाला सामनावीर पुरस्कार मिळाला. सोबतच जगभरात एक वेगळी ओळख देखील मिळाली. अवघ्या 8 धावांच्या अंतराने वेस्ट इंडीजला विजय मिळवला. या विजयाचे श्रेय शमरला मिळाले. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात शमार दुखापत झाली असतानाही गोलंदाजी करत होता.
Shamar Joseph will be getting 3cr in IPL 2024.
– He’s the replacement of Mark Wood for Lucknow Supergiants. pic.twitter.com/GrOVQ3ccIU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 10, 2024
या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला आयपीएलमधून बोलावणे आल्याचे दिसते. असे असेल तरी, शमरची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटणधील कारकीर्द फारच छोटी म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यातच 13 विकेट्स वेगवान गोलंदाजाच्या नावावर झाल्या.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शमरने 7 प्रथम श्रेणी, 2 लिस्ट ए आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याला अनुक्रमे 34, 2 आणि शुन्य अशा विकेट्स मिळल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने काही दिवसांपूर्वी स्वतःची गुणवत्ता ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सिद्ध केली आहे. पण टी-20 फॉरमॅटमध्ये त्याला अद्याप स्वतःला सिद्ध करता आले नाहीये. अशात इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्व प्रयत्न करू शकतो. (Shamar Joseph replaces Mark Wood in Lucknow in IPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
AUSW vs SAW । तिसऱ्या वनडे सामन्यात घडली अनोखी घटना! एका चेंडूवर ऑस्ट्रेलियाला मिळाल्या 13 धावा
INDU19 vs AUSU19 Final : रोहित, कोहली आणि शमीचा बदला घेणार उदय; अन् भारत 84 दिवसांनी विश्वचषक जिंकणार…