---Advertisement---

शमीची तयारी पूर्ण! साधतोय थेट स्टंप्सवर निशाणा; पाहा व्हिडिओ

On: रविवार, ऑक्टोबर 2, 2022 10:55 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला नुकतेच भारताच्या मर्यादित षटकाच्या संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याचा संघात समावेश केला गेलेला. मात्र,  त्यानंतर त्याला कोविड झाल्याने त्याचे पुनरागमन लांबले. ऑस्ट्रेलिया तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. आता तो त्यातून सावरला असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे. आपल्या सोशल मीडिया हँडलवर त्याने व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

मोहम्मद शमी हा भारताच्या अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकात त्याची भारताच्या मुख्य संघात निवड होऊ शकली नाही. मात्र, तो राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाईल. दुसरा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे. तो या दुखापतीतून सावरला नाही तर, शमी याची मुख्य संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/reel/CjLWoxtJFXt/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

कोविडनंतर शमी आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून त्याने एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तो सराव करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो अनेकदा थेट स्टंप्सवर निशाणा साधताना दिसतोय. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

शमी याने बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला थेट विश्वचषकासाठी मैदानात उतरवणे जखमीचे ठरू शकते. याच कारणाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत त्याला सहभागी केले जाण्याची शक्यता आहे. तो दक्षिण आफ्रिके विरुद्धची मालिका खेळल्यावर 11 ऑक्टोबरनंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्यांदा इंडिया लिंजेड्स बनला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेचा दारून पराभव
दिप्ती शर्माच्या धावबाद प्रकरणामुळे पेटले ‘ट्वीटर वॉर’, हर्षा भोगलेंच्या ट्वीटला बेन स्टोक्सकडून प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---