भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चालू असलेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. २१७ धावांच्या भारतीय संघाच्या पहिल्या डावाच्या उत्तरात न्यूझीलंड संघाने २४९ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली. सामन्यादरम्यान बीजे वॅटलिंगचा त्रिफळा उडवल्यामुळे मोहम्मद शमीचे कौतुक केले जात आहे. परंतु त्याचवेळी पाच वर्षे आधीचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शमीने वॅटलिंगला त्याच पद्धतीने त्रिफळा उडवून बाद केले होते.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताकडून ईशांत शर्माने तीन, रविचंद्रन अश्विनने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. परंतु मोहम्मद शमी हा भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखताना शमीने चार गडी बाद केले. एवढेच नव्हे तर महत्त्वाच्या प्रसंगी त्याने विकेटही घेतली. त्यापैकी एक बीजे वॅटलिंगची विकेटही होती. शमीने त्याला असा उत्कृष्ट चेंडू फेकला, ज्यासाठी न्यूझीलंडच्या यष्टीरक्षक फलंदाजाकडे उत्तर नव्हते.
डावातील ७१ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शमीने पहिला शॉर्ट चेंडू टाकून वॅटलिंगला सेट केले. त्यानंतर त्याने पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरुन टाकला. हा चेंडू गुड लेन्थचा होता. त्यामुळे चेंडू टप्पा खाल्ल्यावर थोडासा बाहेर आला. यावेळी फलंदाज वॅटलिंगचे पाय पूर्णपणे चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि चेंडू मधल्या स्टंपवर जाऊन आदळला.
https://twitter.com/93off58/status/1407321466366881801?s=20
या विकेटमुळे सर्वांना २०१६ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील सामन्यांची आठवण झाली. या सामन्यातही शमीने वॅटलिंगला अशाच प्रकारे चेंडूवर बाद केले होते. एवढेच नव्हे तर, त्याने त्यावेळी विकेट घेतल्यानंतर ज्याप्रकारे सेलिब्रेशन केले होते, अगदी यावेळीही तसाच आनंद साजरा केला.
महत्वाच्या बातम्या
‘आयपीएलदरम्यान क्रिकेटपटूंच्या पत्नी ड्रग्स घेतात,’ माजी रॉ एजंटचा गंभीर आरोप
आजच्याच दिवशी ८ वर्षांपुर्वी ‘धोनी आणि कंपनी’ने रचला होता इतिहास, बनला होता एकमेवाद्वितीय कर्णधार
विंडीजला तिहेरी धक्का, कसोटी मालिकेत ०-२ ने धुव्वा उडाल्यानंतर आयसीसीने ठोठावला मोठा दंड






