---Advertisement---

विंडीजला तिहेरी धक्का, कसोटी मालिकेत ०-२ ने धुव्वा उडाल्यानंतर आयसीसीने ठोठावला मोठा दंड

On: बुधवार, जून 23, 2021 9:42 AM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात सेंट लुसियामध्ये खेळल्या गेलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला परभावाला सामोरे जावे लागले. तत्पुर्वीच्या पहिल्या सामन्यातील वेस्ट इंडिज संघाचा लाजिरवाणा पराभव झाला होता. यासह दक्षिण आफिक्राने कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला २-० ने पराभूत केले आहे. या पराभवाच्या धक्यासह वेस्ट इंडिज संघाला अजून एक धक्का लागला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात १४९ तर दुसऱ्या डावात १६५ धावा केल्या होत्या. या सामन्यात दक्षिण अफ्रिकाने जोरदार प्रदर्शन करत वेस्ट इंडिज संघाचा १५८ धावांनी पराभव केला आहे. या मालिकेत दक्षिण अफ्रिका संघाने दोन्ही सामने जिंकत ही मालिका २-० ने आपल्या नावावर केली आहे.

एवढेच नाही तर, पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाच्या हातून लज्जास्पद पराभवानंतर वेस्ट इंडिज संघाला अजून एक धक्का बसला आहे. षटकांची गती कमी ठेवल्यामुळे त्यांना आयसीसीकडून दंड ठोठवण्यात आला आहे. याखेरीज त्यांचे विश्व कसोटी अजिंक्यपदमधील गुणही कापण्यात आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला सामना फीच्या ६० टक्के दंड आकारण्यात आला होता आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सहा गुण वजा करण्यात आले आहेत. निर्धारित वेळेत वेस्ट इंडिजने तीन षटके कमी टाकल्यामुळे सामना रेफरी रिची रिचर्डसनने यांनी त्यांना दंड ठोठावला आहे.

आयसीसीच्या खेळाडूंच्या आचारसंहितेनुसार, षटकांची गती कमी ठेवल्यास खेळाडूंना प्रत्येक षटक दराने सामना फीच्या २० टक्के दंड आकारला जातो. वेस्ट इंडिजने या सामन्यातील ३ षटके कमी गतीने टाकल्यामुळे त्यांना सामना फीच्या ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

संपूर्ण कसोटी मालिकेत वेस्ट इंडीज संघाने संघर्ष केला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीपुढे त्याचे फलंदाज जास्त काळ टिकू शकले नाहीत. सेंट लुसियामध्येच खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी वेस्ट इंडिज संघाचा एक डाव आणि ६३ धावांनी पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेने आता वेस्ट इंडिजमध्ये सलग चार कसोटी सामने जिंकले आहेत. कसोटी मालिकेनंतर दोन्ही देशांमध्ये पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. २६ जूनपासून हे सामने सुरू होतील.

महत्वाच्या बातम्या

नादच खुळा! विराटने आयसीसीच्या स्पर्धांच्या फायनलमध्ये केलेत सचिन-पॉटींगपेक्षाही मोठे विक्रम

बापरे! एका इंस्टाग्राम पोस्टमधून भारतीय क्रिकेटपटू कमावतात बक्कळ पैसा; रोहित घेतो ४२ लाख, तर विराट…

मुथय्या मुरलीधरनला मिळाला २१ व्या शतकातील महान गोलंदाजाचा मान; ‘या’ दिग्गजांना टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---