विराट कोहलीपासून ते रोहित शर्मापर्यंत जवळपास सर्वच क्रिकेटपटू सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर दररोज खेळाडू कोणत्या ना कोणत्या प्रोमोशनल फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. चाहत्यांच्या मनात नेहमी हा प्रश्न निर्माण होत असतो की, एक पोस्ट शेअर करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंना किती मानधन दिले जाते? या लेखातून आपण याबाबत जाणून घेणार आहोत. (I was surprised to see these Indian cricketers earning millions of rupees for a sponsor post)
1. विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॉलोवर्स आहेत. विराटचे इंस्टाग्रामवर 129 मिलियन पेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. विराट कोहलीला इंस्टाग्रामवर एक स्पॉन्सर पोस्ट शेअर करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये दिले जातात. तसेच एका ब्रँडला प्रसिद्धी देणाऱ्या प्रति व्हिडिओसाठी 3 कोटी रुपये इतके मानधन मिळत असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विराट अनेक प्रकारच्या टीव्हीवरील जाहिराती देखील करताना दिसतो.
2. रोहित शर्मा
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व करतो. रोहित शर्मा एकदिवसीय आणि टी-20 मध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नेतृत्त्व करतो. रोहितला इंस्टाग्रामवर एक स्पॉन्सर पोस्ट करण्यासाठी जवळपास 42 लाख रुपये दिले जातात. रोहित शर्माचे इंस्टाग्रामवर 19.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. इतकेच नव्हे, तर रोहित शर्मा अनेक प्रकारच्या टीव्ही जाहिरातींमध्येही दिसतो.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या व्यतिरिक्त सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या देखील इंस्टाग्रामवरून खूप चांगली कमाई करतात. तेच जर ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर विषयी बोलायचे झाले, तर वॉर्नर देखील इंस्टाग्रामवर एक्स स्पॉन्सर पोस्ट शेअर करण्यासाठी २० ते २५ लाख रुपयांपर्यंत मानधन घेतो.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉकडाऊनमध्ये पत्नीने कापले होते पुजाराचे केस; खुलासा करत म्हणाला, ‘पूजाने माझे केस फक्त एकदा…’
तयारी श्रीलंका दौऱ्याची! फिटनेससाठी हार्दिक पंड्या गाळतोय घाम; शर्टलेस फोटो व्हायरल
WTC Final, INDvsNZ, Day 5: राखीव दिवस ठरणार रोमांचक; पाचव्या दिवसाखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी