Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डोक्याला चेंडू लागल्याने पाकिस्तानी फलंदाज दवाखान्यात भरती, भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर?

डोक्याला चेंडू लागल्याने पाकिस्तानी फलंदाज दवाखान्यात भरती, भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर?

October 21, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Pakistan Cricket Team

Photo Courtesy: Twitter/PCB


सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 चा थरार सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षीत सामना रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर 2022 रोजी खेळला जाणार आहे. सर्वांनाच या सामन्याची आतुरता लागली असतानाच पाकिस्तान संघासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा मध्यक्रमातील फलंदाज शान मसूद याच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. सराव सत्रादरम्यान त्याला ही दुखापत झाली, असे दिसते.

माध्यमांतील वृत्तानुसार भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाच्या सराव सत्रात शान मसूद (Shan Masood) दुखापतग्रस्त झाला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद नवाज (Mohammad Nawaz) यावेळी गोलंदाजी करत होता आणि त्याचा एक बाउंसर चेंडू मसूदच्या डोक्याला लागला, असे समोर येत आहे. सध्या मसूद दुखातीमुळे दुखापतीमुळे रुग्णालयात भरती झाला असून डॉक्टरांच्या अहवालानंतर ही दुखापत किती गंभीर आहे, हे समजू शकेल. भारताविरुद्धचा पहिल्या सामन्यातून कदाचित त्याला माघार देखील घ्यावी लागू शकते.

भारतीय संघाचा सामना करण्याआधी पाकिस्तानने इंग्लंडसोबत सराव सामना खेळला. या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्सने पराभव स्वीकारला, पण सलामीवीराच्या रूपात शान मसून महत्वपूर्ण खेळी केली. मसूदने 22 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या आणि संघाला चांगली सुरुवात देखील दिली. पाकिस्ताचने नियमित सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवा आणि बाबर आझम या सामन्यात खेळत नसल्यामुळे मसूदला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. मसूद पाकिस्तान संघासाठी मध्यक्रमातील महत्वाचा फलंदाज आहे. तसे पाहिले तर पाकिस्तान संघ सध्या मध्यक्रमत कमजोर मानली जात आहे. अशात मसूद जर दुखापतीमुळे भारताविरुद्ध खेळू शकला नाही, तर संघाच्या अडचणी नक्कीच वाढतील.

A moment of extreme scare. Mohammad Nawaz is distraught and down on the ground after his shot hits Shan Masood flash at the back of his neck😳

Watch this exclusive footage on @Sportskeeda. #T20WorldCup #INDvsPAK pic.twitter.com/9JrhGQ0ZSg

— Srinjoy Sanyal (@srinjoysanyal07) October 21, 2022

टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला पाकिस्तान संघ –
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, हैदर अली, शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, आसिफ अली (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, हारिस रैफ, फखर जमान, शाहीन अफरीदी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 दिग्गजांच्या पंक्तीत बसला आयर्लंडचा हिरो पॉल स्टर्लिंग; देशाचीही उंचावली मान
पाकिस्तान संघाच्या जर्सीत दिसला रोहित शर्मा! पाहा नक्की काय आहे प्रकरण 


Next Post
Nicholas-Pooran

या कारणांमुळे आम्ही हरलो! लाजिरवाण्या पराभवानंतर पूरनने वाचला चुकांचा पाढा

India-vs-Pakistan

बीसीसीआय अन् पीसीबीमधील वाद मिटवण्याचा दम आयसीसीमध्ये आहे का? वाचा एका क्लिकवर

Photo Courtesy: Twitter/ Virat Kohli

विराट कोहली टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसाठी ठरलायं 'डेंजरझोन', एकदा आकडेवारी पाहाच

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143